ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने प्रथमच आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ओव्हलमध्ये हा संघ भारतासोबत खेळेल. तसेच, या सामन्यात भारताने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सामना सुरु झाल्यानंतर सुरुवातीचा एक तास या संघासाठी चांगला गेला नाही. संघाने पहिली विकेट लवकर गमावली. त्यानंतर मार्नस लाबुशेनसोबत असे काही घडले की ऑस्ट्रेलियन संघाचा श्वास रोखला गेला.
चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाने आपली पहिली विकेट गमावली. तसेच, मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर त्याचा झेल यष्टिरक्षक केएस भरतने टिपला. निराशाजनक बाब म्हणजे ख्वाजाला खातेही उघडता आले नाही.
ख्वाजा बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला सांभाळून खेळणे गरजेचे होते. वॉर्नर आणि लबुशेन धावा करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याच दरम्यान लबुशेन एका चेंडूवर झालेल्या गंभीर दुखापतीतून बचावला. आठवी ओव्हर टाकणाऱ्या सिराजने शॉर्ट ऑफ लेन्थचा चेंडू टाकला, जो लाबुशेनने आधी खेळण्याचा प्रयत्न केला पण नंतर त्याने आपला विचार बदलला. पण नंतर तो चेंडू त्याच्या अंगठ्याला लागला. चेंडू लाबुशेनला इतका जोरात लागला की त्याने हातातली बॅट हवेमध्येच सोडली.
https://www.instagram.com/reel/CtL4rV_peoU/?utm_source=ig_web_copy_link
लाबुशेनचा व्हिडीओ व्हायरल
चेंडू त्याच्या अंगठ्याला लागल्याने तो वेदनेने ओरडू लागला. हातातील बॅट हवेमध्येच सोडत त्याने हातमोजे काढले आणि अंगठ्याकडे पाहू लागला. दरम्यान, फिजिओथेरपिस्ट आले आणि लबुशेनचा उपचार केला. त्यानंतर लबुशेन पुन्हा फलंदाजीसाठी सज्ज झाला. ख्वाजाच्या रूपाने पहिली विकेट गमावल्याने ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत आला होता. पण डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि लाबुशेन (Marnus Labuschagne) यांनी चांगली भागीदारी करून संघाला अडचणीतून बाहेर काढले. दोघांनी 69 धावांची भागीदारी करून संघाला सांभाळले. वॉर्नर अर्धशतकाकडे वाटचाल करत होता पण शार्दुल ठाकूरने त्याचा डाव संपवला. वॉर्नरला केवळ 43 धावा करता आल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टॉस रोहितने जिंकला अन् विक्रम विराटच्या नावावर झाला, पाहा नक्की काय घडलं?
ओडिसा रेल्वे अपघातग्रस्तांना WTC फायनलमध्ये वाहिली गेली श्रद्धांजली, भारतासह ऑस्ट्रेलियन संघानेही व्यक्त केला शोक