---Advertisement---

जेव्हा विराटचे ‘नोटबुक’ सेलिब्रेशन पाहून खुद्द बिग बी म्हणाले होते, ‘किती वेळा सांगू, त्याला छेडू नकोस’

On: सोमवार, जून 14, 2021 5:32 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या उत्कृष्ट खेलीसाठी ओळखला जातो. तर कधी कधी मैदानावर त्याचा रागही पाहायला मिळाला आहे. मैदानावर मोठमोठे गोलंदाज विराटला घाबरतात. तर काही खेळाडू त्याच्या रागाचे शिकार होतात. एक वेळेस वेस्टइंडीजचा गोलंदाज केसरीक विलियम्सला विराटच्या रागाचा सामना करावा लागला. भारतीय कर्णधारनी आपल्या अंदाजात विलियम्स प्रतिउत्तर दिले होते.

साल 2017 मध्ये वेस्टइंडीजचा गोलंदाज केसरीक विलियम्स आणि विराटमध्ये मैदानावरच वाद सुरू झाला होता. विलियम्सने विराटला त्याच्या गोलंदाजीने बाद केले होते. त्याच वेळेस त्याने ‘नोटबुक’ सेलिब्रेशन केले होते. विराट एक असा खेळाडू आहे जो विरुद्ध गोलंदाजाला आपल्या फलंदाजीने उत्तर देतो.

त्यानंतर 2019 सालामध्ये हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विलियम्सला सडेतोड उत्तर दिले. विराटला संधी मिळताच विलियम्सच्या गोलंदाजीवर उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यावेळी विराटनेही विलियम्सच्या अंदाजात ‘नोटबूक सेलिब्रेशन’ केले होते. हा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाला.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील या घटनेबाबत सोशल मीडियावर एक रंजक ट्विट केले होते. बिग बी यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले की, ” यार मित्रा मी तुला किती वेळा सांगू… विराटला छेडू नकोस, छेडू नकोस, छेडू नकोस…. पण तू माझे ऐकतच नाहीस…. कुठे आहेस तू…. आता चिठ्ठी लिहून दिली ना तुझ्या हातात!!!! पहा आणि पहा … वेस्ट इंडिजचा चेहरा पाहून त्याने त्याला किती मारले, किती मारले !!’

बिग बीचे हे ट्विटही खूप व्हायरल झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

सुशांत सिंग राजपूत म्हणाला होता, धोनी आणि माझी कहानी सारखीच…

कसोटी चॅम्पियनशीप: ६ मालिका, १७ सामने; ‘असा’ होता विराटसेनेचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

सुशांत सिंगच्या प्रश्नांना कंटाळून रागावला होता कॅप्टनकूल धोनी; म्हणाला होता, मी नंतर येतो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---