वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजने 16 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 200 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाचे अर्धे खेळाडू 15 षटकांपर्यंत पॅव्हेलियनमध्ये परतले होते. चांगल्या फॉर्ममध्ये असणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचकडून संघाला अपेक्षा होत्या. परंतु फॅबियन ऍलनने सीमारेषेजवळ अद्भुत झेल टिपत फिंचला पव्हेलियनला धाडले. सोशल मीडियावर फॅबियनच्या या झेलचे खूप कौतुक होत आहे.
खरं तर, सतत वाढत चाललेला रनरेट पाहता 10 व्या षटकातील हेडन वॉल्शच्या दुसऱ्या चेंडूवर फिंचने हवेत शॉट मारला. तेथे क्षेत्ररक्षण करणार्या फॅबियन एलनने चेंडूच्या दिशेने वेगाने धाव घेत हवेत सुरेख डाईव्ह मारली आणि झेल घेतला. एलनने हा झेल फक्त एका हाताच्या साहाय्याने पकडला. झेल घेतल्यानंतर एलनची प्रतिक्रिया देखील पाहण्यासारखी होती. या डावात फिंचने 6 चौकारांच्या मदतीने 34 धावा केल्या.
दरम्यान वेस्ट इंडिजच्या लक्ष्याचा पाठलाग करतााना ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली. 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना खाते न उघडता जोस फिलिप शेल्डन कॉटरेलच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर कर्णधार फिंचसह मिशेल मार्शने दुसर्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली. पण आंद्रे रसेलने मार्शला बाद करून वेस्ट इंडिजचा विजय निश्चित केला. पुढे 21 धावांची खेळी करून लयीत दिसणारे मोइसेस हेनरिक्स खूप वाईट पद्धतीने धावबाद झाला.
What a catch from Fabian Allen pic.twitter.com/w5F042PlSe
— William Mitchell (@news_mitchell) July 17, 2021
तत्पुर्वी पहिल्या डावात वेस्ट इंडिजकडून आंद्रे फ्लेचर (16 धावा) आणि एव्हिन लुईस (79 धावा) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 40 धावा जोडल्या. फ्लेचरला अॅडम झांपाने बाद करत तंबूत परत पाठवले. यानंतर ख्रिस गेलने मैदानावर येऊन धुव्वाधार फलंदाजी केली आणि केवळ 7 चेंडूत 21 धावा दिल्या.
परंतु गेलला या तुफानी खेळीला मोठ्या आकडी खेळीत रूपांतर करण्यात अपयश आले आणि तो स्वॅपसनचा बळी ठरला. कर्णधार पूरननेही जोरदार फटकेबाजी करत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 31 धावांची महत्वाची खेळी केली. आंद्रे रसेल (1) आणि फॅबियन एलन (1) शेवटच्या षटकात फलंदाजीत विशेष कामगिरी करून दाखवू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून अँड्र्यू टायने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर मिशेल मार्श आणि अॅडम झंपा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२०त ९ वर्षांपासून भारताला पराभूत करू शकला नाही पाकिस्तान, विश्वचषकात ‘अशी’ राहिलीय कामगिरी
राहुल-अथियाच्या नात्यावर सुनिल शेट्टींनी सोडले मौन; म्हणे, ‘हे जोडपं एकमेकांना शोभून दिसतं’
बळींचा पंच घेत वयाची तिशी पार केलेल्या बांगलादेशच्या ‘या’ गोलंदाजाने रचला इतिहास, ठरला पहिलाच