---Advertisement---

ओहो! एका बोटावर बॅट बॅलन्स करण्याच्या आवाहनात अनुष्काची विराटला काट्याची टक्कर, Video व्हायरल

On: शनिवार, जुलै 3, 2021 9:16 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा चाहत्यांची आवडती जोडी आहे. विरुष्काची मस्त आणि प्रेमळ केमिस्ट्री लोकांना फार आवडते. इंडस्ट्रीच्या चकाकीपासून दूर हे दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा खूप आनंद घेतात. अनुष्का आणि विराट सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या मनोरंजक पोस्टमधून ते नेहमी चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. दोघांचे व्हिडिओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत असतात आणि चाहतेही त्यांना खूप पसंती दर्शवत असतात.

नुकताच विराट आणि अनुष्काचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत अनुष्का पती विराटला एक आवाहन देत आहे. इतकेच नव्हे तर अनुष्का विराटला बरोबरीची टक्कर देखील देत आहे. या दोघांमध्ये झालेल्या या स्पर्धेचा व्हिडीओ खूप मजेशीर आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विराट आणि अनुष्का आपल्या हाताच्या एका बोटावर क्रिकेटच्या बॅटला संतुलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघेही खूप छान पद्धतीने बॅटचे संतुलन बनवून ठेवताना दिसत आहेत. जर आपण असे म्हटले की, अनुष्काने विराटपेक्षाही चांगल्या पद्धतीने बॅटला संतुलित केला, तर हे चुकीचे ठरणार नाही. परंतु या स्पर्धेमध्ये ना कोणी विजयी झाले तर ना कोणी पराभूत. कारण दोघेही आपल्या बॅटला शेवटपर्यंत संतुलित करत होते.

https://www.instagram.com/reel/CQ0KmqvJ9PT/?utm_source=ig_web_button_share_sheet

तुम्हाला माहितीच असेल की, अनुष्का शर्मा सध्या मुलगी वामिका आणि पती विराट कोहलीसोबत इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमध्ये विराट कोहली सध्या येत्या कसोटी मालिकेच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. तर अनुष्का मुलगी वामिकासोबत इंग्लंडमध्ये फिरताना दिसून येत आहे. या दिवसात अनुष्काचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये अनुष्का आणि स्टॉलरमध्ये आराम करत असलेली वामिका दिसून येत आहे. नेहमीप्रमाणेच वामिकाचा चेहरा यावेळी देखील चाहत्यांसमोर आला नाही. विराट आणि अनुष्काने अजूनही आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, सध्यातरी वामिकाला कॅमेरासमोर आणले जाणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

क्वारंटाईन संपवून ‘टीम धवन’ सरावासाठी उतरली मैदानात, फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

दहाव्या नंबरवर फलंदाजीला येत एकट्याच्या जीवावर भारताला दिवसा चांदणे दाखवणारा अवलिया क्रिकेटर

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---