महिला टी20 विश्वचषक (Women’s T20 World Cup 2024) चे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आता सर्व सामने बांगलादेशऐवजी यूएईमध्ये खेळले जाणार आहेत. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारताचा सामना दुबईत पाकिस्तानशी होणार आहे. (6 ऑक्टोबर) रोजी भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना दुबईत रंगणार आहे.
टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना अ गटात ठेवण्यात आलं आहे. ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. महिला टी20 विश्वचषक 2024चा पहिला सामना बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे. हा सामना (3 ऑक्टोबरला) शारजाहमध्ये खेळला जाणार आहे.
महिला टी20 विश्वचषकाच्या या स्पर्धेत एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ 4 गट सामने खेळणार आहे. या सामन्यांपूर्वी एकूण 10 सराव सामने खेळवले जाणार आहेत. टी20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना (17 ऑक्टोबर) रोजी दुबईत खेळवला जाणार आहे. दुसरा उपांत्य सामना (18 ऑक्टोबर) रोजी शारजाह येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर (20 ऑक्टोबरला) दुबईत अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघाचे वेळापत्रक
4 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
6 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
9 ऑक्टोबर- भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
13 ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीच्या भविष्यावर माजी दिग्गजानं केलं खळबळजनक वक्तव्य!
विराट कोहली मॅचदरम्यान घालतो ‘इतका’ महागडा चष्मा, त्याची डिझाईनही आहे खास
लखनऊ सुपर जायंट्स राहुलला कायम ठेवणार? आयपीएल 2025 लिलावापूर्वी संजीव गोयंकांची घेतली भेट