श्रीलंका क्रिकेट बोर्डाची महत्त्वकांक्षी लंका प्रीमियर लीग (एलपीएल) २७ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. अनेक कारणांनी चर्चेत राहिलेल्या या स्पर्धेला हंबनटोटा येथे सुरुवात होईल. स्पर्धेपूर्वी, बऱ्याच आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यात, श्रीलंकेच्याच लसिथ मलिंगाचा देखील समावेश होता. पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या या स्पर्धेतून बाहेर पडल्याने मलिंगावर चाहत्यांनी टीका केली होती. चाहत्यांच्या या वर्तनामुळे व्यथित झालेल्या मलिंगाने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.
एलपीएल यशस्वी व्हावी
जगातील सर्वोत्कृष्ट टी२० गोलंदाज असा लौकिक मिळवलेला मलिंगा एका मुलाखतीत म्हणाला, “लंका प्रीमियर लीग यशस्वी व्हावी, अशी माझी इच्छा आहे. काही लोकांना आश्चर्य वाटते की, एखाद्याने इतके क्रिकेट खेळले असेल तर, तयारीची कमतरता कशी भासू शकते. मात्र, फक्त घर आणि जिममध्ये तयारी करुन सामन्यासाठी उतरता येत नाही. मी सामन्यावेळी यॉर्कर्स फेकतो. त्या प्रकारचे चेंडू टाकण्यासाठी मी हजार वेळा सराव केला आहे. हे सर्व अचानक घडलेले नाही.”
“मी देशासाठी काय केले आहे हे संपूर्ण जगाला माहित आहे” – मलिंगा
एलपीएलमध्ये सहभागी होणार नसल्याने मलिंगावर टीकेची झोड उठली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देत मलिंगा म्हटला, “जर मला एलपीएलमध्ये यॉर्कर मारणे शक्य झाले नाही तर, लोक मला असाही प्रश्न विचारतील की, तू आयपीएलमध्ये यॉर्कर टाकतो. मात्र, एलपीएलमध्ये तुला हे शक्य होत नाही. हे तेच लोक आहेत जे, श्रीलंकेच्या संघात खेळत असताना माझ्या नावाचा जयघोष करतात. आयुष्यात काही गोष्टी आपल्या बाजूने घडत नाहीत. त्यावेळी, आपल्याला त्याचे पुनरावलोकन करावे लागते. सर्व जगाला माहित आहे की, मी श्रीलंकेसाठी काय केले आहे.”
गॅले ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळणार होता मलिंगा
मलिंगा एलपीएलमध्ये गॅले ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळणार होता. मात्र, वैयक्तिक कारणांनी त्याने मागील आठवड्यात स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. तत्पूर्वी, आयपीएल २०२० मधूनही वडिलांच्या आजारपणाचे कारण देऊन तो बाजूला झाला होता. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सशी करारबद्ध आहे. सध्या मलिंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त टी२० क्रिकेट खेळतो.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेंकिंग ! महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन
“आमचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी तयार” ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने फुंकले रणशिंग
“युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसला नाही”, धोनीच्या वक्तव्यावर ऋतुराज गायकवाडने सोडले मौन
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज
भारतीय संघातील ५ खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत केली आहे दमदार कामगिरी
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज