दोन वर्षांपूर्वी, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकून इतिहास रचला होता आणि असे करणारा तो पहिला आशियाई कर्णधार ठरला होता. कोहली मैदानावर महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि या गुणवत्तेमुळे ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जॉन बुकनान यांनी कोहली आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यात असलेली समानता दाखवून दिली आहे.
बुकनान म्हणाले की कोहलीमध्ये गांगुलीची झलक दिसते. बलाढ्य विरोधकांविरुद्ध सामने जिंकण्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील असतो.
“सौरवने पदभार स्वीकारल्यानंतर त्याने केवळ खेळण्याचाच वेगळा मार्ग नव्हे तर ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत विरोधकांविरूद्ध वेगळ्या पद्धतीने नेतृत्व करण्याचेही काम केले होते. निश्चितपणे ही चांगली बाब होती. परंतु गांगुलीने त्याचा खेळ वेगळ्या स्तरावर नेला होता. गांगुलीप्रमाणे कोहलीनेही भारतीय संघासाठी असेच केले आहे.” असे बुचनान म्हणाले.
ऑस्ट्रेलियात 2018-19 मध्ये भारताच्या 2-1 ने मिळवलेल्या विजयात कोहलीचे नेतृत्व महत्त्वाचे होते, असे सांगून बुकनानने कोहलीची स्तुती केली.
“त्याने एक अविश्वसनीय असे चांगले काम केले आहे – मग तो धावा करत आहे की नाही याचा विचार न करता जर आपण 2019 च्या मालिकेत पाहिले तर पुजारा या मालिकेचा स्टार फलंदाज होता. त्यापाठोपाठ कोहलीनेही आपले योगदान दिले. परंतु कोहलीचे खरे योगदान म्हणजे त्याचे नेतृत्व. त्याने ज्या प्रकारे महानता प्रस्थापित केली आहे – तो केवळ खेळ जिंकणेच नव्हे तर संघांना पराभूत करण्याचा मार्ग शोधू शकतो, ‘असे बुकनान म्हणाले.
यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत पहिला सामना दिवस-रात्र खेळणार आहे. तसेच हा सामना झाल्यानंतर विराट मायदेशी परतणार आहे. कारण त्याची पत्नी अनुष्का शर्मा त्यांच्या पहिल्या बाळाला जानेवारी 2021 मध्ये जन्म देणार आहे. त्यामुळे विराट कसोटी मालिकेतील शेवटचे तीन कसोटी सामने खेळणार नाही.
याबद्दल बुकनान यांना वाटते की कोहलीची अनुपस्थिती केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही भारताला जाणवेल. “त्याच्या जागी अजिंक्य रहाणे असण्याची शक्यता आहे, तो एक चांगला खेळाडू असेल. परंतु कोहली त्याच्यापेक्षा काहीतरी खास आहे. कोहली भारताला आवश्यक आहे. कारण हा मोठा दौरा असणार आहे, ” असे बुकनान म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल स्पर्धेत शिकला डावपेच; आता भारतीय संघाला देणार आव्हान ?
Video: वृद्धिमान साहा दुखापतीतून सावरला? नेटमध्ये सुरु केला सराव
डेविड वॉर्नरच्या मधव्या मुलीला आवडतो भारताचा ‘हा’ क्रिकेटपटू, पत्नी कँडिसने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख –
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी