सध्याच्या काळात सर्वसामान्य व्यक्तींपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्व सोशल मीडियावर व्यस्त असतात. सोशल मीडिया ही एक प्रकारे लोकांची गरज बनली आहे. यासर्वांपासून क्रिकेटपटू देखील दूर राहिले नाहीत. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान हादेखील सातत्याने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून काहीतरी पोस्ट करत असतो. राशिदने आज असेच एक छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले आहे. त्या छायाचित्राच्या माध्यमातून, त्याने आपल्या चाहत्यांसाठी एक कोडे टाकलेले दिसून येते.
“सांगा किती राशिद?”
राशिदने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून स्वतःचे एक छायाचित्र शेअर करत त्याखाली, ‘राशिदच्या पुढे दोन राशिद, राशिदच्या मागे दोन राशिद, सांगा किती राशिद?’ असा प्रश्न विचारला आहे. खरंतर, राशिद या छायाचित्रात अनेक आरशांच्या मधोमध उभा राहिला आहे. त्यामुळे त्याची अनेक प्रतिबिंबे दिसत आहेत.
चाहत्यांनी दिली मजेशीर उत्तरे
राशिदच्या या छायाचित्राखाली अनेक मजेशीर रिप्लाय चाहत्यांनी केले आहेत. एका चाहत्याने त्याच्या कोड्याला उत्तर देताना म्हटले आहे, “यात पाच राशिद आहेत. त्यातील एकाला भारताचा क्रिकेटपटू बनवा.”
दुसऱ्या चाहत्याने या छायाचित्राखाली टिप्पणी करताना म्हटले, “विचार करा, एखाद्या संघात पाच राशिद आहेत. हे पाच राशिद मिळून २० षटके गोलंदाजी करतील आणि विरोधी संघ ८० धावांच्या पुढे जाऊ शकणार नाही.”
दुसर्या एका चाहत्याने, “पाच राशिदची गरज नाही. एकच करामती खान पुरेसा आहे.” अशा प्रकारची उत्तरे दिली आहेत.
राशिद खानचे भारतात असंख्य चाहते आहेत. नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२० मध्ये त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले होते. हैदराबादच्या क्वालिफायर २ पर्यंतच्या प्रवासात राशिदने मोठी भूमिका बजावली होती. राशिदने स्पर्धेत १६ सामने खेळताना २० बळी मिळवले होते. राशिद १० डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये ऍडलेड स्ट्रायकर्स संघाकडून खेळताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
दिग्गजाने निवडलेल्या परदेशी खेळाडूंच्या आयपीएल संघात स्टोक्सला डच्चू; ‘हा’ आहे कर्णधार
दक्षिण आफ्रिका-इंग्लंड क्रिकेट मालिकेवर कोरोनाचं सावट; खेळाडू आढळला पॉझिटिव्ह
विराट कोहलीचे मोठे मन! महाराष्ट्रातील दहा हजार कुपोषित मुलांच्या मदतीसाठी केला हात पुढे
ट्रेंडिंग लेख-
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी






