नुकताच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा हंगाम संपला आहे. याच्याशी संदर्भात भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे विधान केले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर टी२० क्रिकेटचे सामने विश्वचषकापूरतेच मर्यादित असावे असेही मत त्यांनी मांडले आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना शास्त्री म्हणाले, ‘आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) द्विपक्षीय टी२० मालिका बंद करावी. जेणेकरून लीगच्या सामन्यांना अधिक वेळ मिळेल, असे झाल्यास एका वर्षात दोन आयपीएलच्या(IPL- Indian Premier League) स्पर्धा होतील.”
शास्त्रींनी फुटबॉल क्लब्सचे उदाहरण दिले आहे. “फुटबॉलमध्ये क्लब्स हे सर्वाधिक लीगचे सामने खेळतात, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वचषक जवळ आला असता तेव्हा काही सामने खेळले जातात. आयसीसीनेही याचे अनुकरण करावे. तसेच प्रत्येक देशाला त्यांची लीग स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी आहे. संघांनी घरच्या मैदानावर खेळून मग दर दोन वर्षांनी विश्वचषक खेळायचा हे योग्य आहे,” असे शास्त्रींनी सुचविले आहे.
“भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होतो, तेव्हा विश्वचषकाचे सामने वगळता मागील पाच-सहा वर्षांत संघ किती सामने खेळला? हे आठवत नाही. तर यामध्ये फक्त विजेता संघच लक्षात राहतो. पण दुर्दैवाने आम्ही एकदाही जिंकलो नाही,” असेही शास्त्री पुढे म्हणाले आहेत.
टी२० क्रिकेट हे जगप्रसिद्ध आहे. त्याच्या अनेक स्पर्धा पाकिस्तान (पाकिस्तान सुपर लीग), ऑस्ट्रेलिया (बिग बॅश लीग), इंग्लंड (टी२० ब्लास्ट आणि द हंड्रेड), न्यूझीलंड (सुपर स्मॅश) इतर देशांत होतात. तर ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड हे देश महिलांच्या टी२० लीग स्पर्धाही आयोजित करतात. त्यातच बहरिन, जर्मनी, अमेरिका, कॅनडा अशासारखे काही देशही टी२० क्रिकेटचे सामने खेळतात. जर टी२० लीग स्पर्धा अधिक झाल्या तर भविष्यात टी२० क्रिकेट अजून लोकप्रिय होऊ शकते.
यावरून, “आयपीएलचे एका वर्षात १४० सामने खेळवायचे. त्यात ७०-७० सामन्यांचे दोन हंगाम असे झाले तर अधिक चांगले. यात पुढे काय होईल हे सांगता येणार नाही,” असे शास्त्रींनी म्हटले आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsSA। आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर फळफळले मिलरचे नशीब; दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने आखला प्लॅन
IPL 2022| जडेजाची १ विकेट ३.२ कोटीला, तर चौधरीने करून दिले पैसे वसूल, पाहा महागडे आणि स्वस्त गोलंदाज
सचिनने निवडली आयपीएल २०२२ची बेस्ट इलेव्हन; धोनी, विराट, रोहितला वगळले, मग कर्णधारपदी कोण?