भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना (16 ऑक्टोबर) बेंगळुरूच्या मैदानावर खेळला जात आहे. पण पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकताच संपला. पहिला दिवस पावसाने वाहून गेल्यानंतर आता दुसऱ्या दिवशीही पाऊस पडणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण बेंगळुरूच्या हवामानाबद्दल जाणून घेऊया.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या दिवशीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक्यूवेदर (Accuweather) नुसार दुसऱ्या दिवशी सकाळी बेंगळुरूमध्ये सुमारे 50 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय दुपारनंतर जवळपास 40 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
भारत-न्यूझीलंड संघातील आता दुसऱ्या दिवशी नाणेफेक आणि सत्राच्या वेळेत काही बदल करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी नाणेफेक 9.00 वाजता होणार होती आणि खेळ 9.30 वाजता सुरू होणार होता. पण दुसऱ्या दिवशी नाणेफेक 8:45 वाजता ठेवण्यात आली आहे. याशिवाय दिवसाचे पहिले सत्र 9:15 पासून सुरू होणार आहे.
3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप
न्यूझीलंड- टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, मार्क चॅपमन, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर, रचिन रवींद्र, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), एजाज पटेल, मॅट हेन्री, टिम साउथी, विल्यम ओ. रूरके, जेकब डफी
महत्त्वाच्या बातम्या-
BAN vs SA; बांगलादेशच्या ‘या’ स्टार खेळाडूला शेवटचा सामना खेळण्याची संधी!
IND vs NZ; कोहलीच्या नेतृत्वाखालील ‘हा’ रेकाॅर्ड मोडणे रोहित शर्मासाठी कठीण!
PAK vs IND; “ड्रेसिंग रूममध्ये भारताबद्दल बोलण्यास…” पाकिस्तान कर्णधाराचे मोठे वक्तव्य!