भारत-इंग्लंड (India vs England) संघात उद्यापासून (6 फेब्रुवारी) 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू होईल. दरम्यान दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी नागपूरच्या मैदानावर आमने-सामने असतील. तत्पूर्वी भारत-इंग्लंड सामन्यावर पावसाचे सावट असेल का? तसेच दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 याबद्दल देखील जाणून घेऊया.
नुकतीच भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. त्यामध्ये सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाने 4-1 ने मालिका आपल्या खिशात घातली. आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडशी लढताना दिसेल. तत्पूर्वी वनडे मालिकेत दोन्ही संघात तेच खेळाडू खेळताना दिसतील, जे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार आहेत.
(6 फेब्रुवारी) रोजी नागपूरच्या मैदानावर हवामान कसे असेल? पाऊस पडण्याची शक्यता आहे का? असे प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामन्यादिवशी पावसाची कोणतीही शक्यता नाही. दिवस रात्र सामन्यासाठी हवामान चांगले राहील.
पहिल्या वनडे सामन्यासाठी इंग्लंड संघाची प्लेइंग 11- बेन डकेट, फिल साल्ट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, जैकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकीब महमूद
भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वरूण चक्रवर्ती ,अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची सुरुवात (19 फेब्रुवारी) पासून होणार आहे. शुभारंभ सामन्यातच पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने असणार आहेत. त्यानंतर भारतीय संघ (20 फेब्रुवारी) रोजी बांगलादेशी सामना खेळून या मेगा स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG: ‘मी येथे स्पष्टीकरण…..’, निवृत्तीच्या प्रश्नावर हिटमॅनच्या तळपायाची आग मस्तकात
सरकारने भारतीय खेळाडूसाठी तिजोरी उघडली, बक्षीस म्हणून 1 कोटी रुपयांची घोषणा
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीने केली पंचांची यादी जाहीर..! भारतीय पंच यादीतून गायब