भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यातील एकमात्र कसोटी सामना संपल्यानंतर तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे. कसोटी सामना ५ जुलै रोजी संपला असून ७ जुलैपासून टी-२० मालिकेला सुरुवात होईल. परंतु यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळण्याची खात्री नाहीये.
इंग्लंडविरुद्ध १ जुलै ते ५ जुलै दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात देखील रोहित शर्मा (Rohit Sharma) सहभागी होऊ शकला नव्हता. कसोटी सामन्यापूर्वी लिसेस्टरशायरविरुद्ध खेळल्या गेलेल्या चार दिवसीय सराव सामन्यात रोहित खेळत होता, परंतु सामन्यादरम्यान त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याच कारणास्तव त्याने सराव सामन्यातून माघार घेतली आणि कसोटी सामन्यातही खेळू शकला नाही. रोहित आता कोरोनातून सावरला आहे आणि रविवारी (०३ जुलै) त्याने मैदानात सरावही केला. परंतु आता असे समोर आले आहे की, रोहित इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात खेळण्याची शक्यता नाहीये.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “रोहित शर्माला कोरोना संक्रमणातून जावे लागले आहे. त्याला बरे होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्याने सराव सुरू केला आहे, पण रोहितचे खेळणे हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. प्रशिक्षक आणि कर्णधार याविषयी निर्णय घेतील. आम्हाला तो खेळण्याची अपेक्षा आहे.”
अजून एका कोरोना चाचणीला तोंड द्यावे लागणार
सोमवारी (४ जुलै) रोहित शर्माने ४५ मिनिटे नेट्समध्ये सराव केला आणि क्षेत्ररक्षणाचाही सराव केला. पण पहिल्या कसोटीत तो खेळेल की नाही?, हे सामन्याच्या आधी समजू शकेल. माहितीनुसार रोहितला टी-२० मालिकेत सहभाग घेण्यासाठी अजून एका कोरोना चाचणीला तोंड द्यावे लागणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने आधीच घोषित केले आहे की, टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात राहुल द्रविडऐवजी वीवीएल लक्ष्मण संघाचे प्रशिक्षक असतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डची मोठी डील! पुढील पाच वर्षांमध्ये खेळाडूंना मिळणार ‘इतके’ कोटी
कॅप्टन बुमराहने रचला इतिहास, पाकिस्तानच्या दिग्गजाचा विक्रम मोडत सेना देशांत केली ‘ही’ कामगिरी
भारतासाठी ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खबर, लक्ष्मणची संघाचा प्रशिक्षक म्हणून निवड