जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाला सुरुवात होण्यासाठी पाच दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे. त्याचवेळी चार वेळा विजेतेपद जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या गोटातून मागील वर्षी घडलेल्या घटनेची नवी माहिती समोर येत आहे.
मागील वर्षी आयपीएल हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी एमएस धोनीने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देत रवींद्र जडेजाकडे नेतृत्व सोपवले होते. मात्र, त्यावेळी संघ तसेच स्वतः जडेजा चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्यामुळे अखेरच्या काही सामन्यांसाठी पुन्हा धोनीकडे संघाची जबाबदारी देण्यात आलेली. त्यानंतर जडेजाने दुखापतीचे कारण देत टीम हॉटेल सोडलेले. तसेच सीएसके बाबतच्या सर्व सोशल मीडिया पोस्ट देखील त्याने डिलीट केलेल्या.
या संपूर्ण प्रकरणात धोनीने समेट घडवून आणलेला. जडेजा फ्रेंचाईजीवर नाराज असताना धोनीने त्याच्याशी वैयक्तिकरित्या बोलून त्याला संपूर्ण परिस्थिती सांगून वेगळा विचार न करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर जडेजाची नाराजी दूर झाली व तो पुन्हा एकदा सीएसकेचाच भाग राहणार आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी आता कोणीही नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिलेय.
आयपीएल 2023 साठी सीएसकेचा संघ: एमएस धोनी ( कर्णधार), रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगारगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, माथेर सिंग, महेश थिक्षना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन, अजय मंडल, भगत वर्मा, सिसांडा मगाला.
(There Is No Rift Between CSK And Jadeja Dhoni Handle Situation)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेवटी कळलंच! विराट कोहली वापरतो ‘या’ कंपनीचा मोबाईल, किंमत लाखोंच्या घरात
मुंबईच्या वाघाचे ‘ऐका दाजीबा’ गाण्यावर मराठमोळ्या अंदाजात स्वागत; नेटकरीही म्हणाले, ‘एकच छावा’