भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्यायवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची संघ मोठी आहे. विराट भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कदाचित सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू देखील राहिला असेल. सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी यांच्यानंतर विराट कोहली भारताचा सर्वात मोठा क्रिकेटपटू म्हणून समोर आला आहे. चाहत्यांचे विराटवर असणारे प्रेम वेळोवेळी दिसून आले आहे. अशाच एका चाहत्याने थेट विराटच्या नावावने रेस्टॉरंट सुरू केले आहे.
विराट कोहली (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघाचा मागच्या दशकातील सर्वात महत्वाचा खेळाडू राहिला आहे. सध्या तो भारताचे कर्णधार नाहीये. पण 2021 पर्यंत काही वर्ष त्याने कर्णधाराच्या रुपात संघासाठी भूमिका पार पाडली. 2008 मध्ये विराटने देशासाठी पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला. मागच्या 15 वर्षांमध्ये त्याने अनेक असे विक्रम केले, जे मोडणे कठीण आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत त्याने अलिकडच्याच काळात सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडला. भविष्यात तो सचिनच्या सर्वाधिक 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम देखील मोडू शकतो.
भारतीय क्रिकेटसाठी मागच्या मोठ्या काळापासून विराट प्रामाणिकप्रणे चांगल्या प्रदर्शन करत आला आहे. यासाठी त्याने कठोर मेहनत घेतली अशून शिस्त पाळली आहे. याचाच परिणाम म्हणून विराटवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांची संघ मोठी आहे. विराटप्रति असणारे प्रेम दाखवण्याची पद्धत प्रत्येक चाहत्याची वेगळी वेगळी असते. अशाच एका चाहत्याने बेंगलोरमध्ये थेट विराटच्या नावावने रेस्टॉरंट सुरू केले आहे. या चाहत्याने रेस्टॉरंटला नाव दिले आहे, “कोहलीचे किचन.” या रेस्टॉरंटचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येत आहेत.
A cricket fan has named his hotel’s name as “Kohli’s Kitchen” in Bengaluru.
– The crowd favourite, King 👑 pic.twitter.com/79jSN3EdOA
— Johns. (@CricCrazyJohns) February 11, 2024
Virat Kohli’s fan named his Hotel in Bengaluru after him! ☺️@imVkohli • #ViratKohli𓃵 • #ViratGang pic.twitter.com/71gtKHauND
— ViratGang (@ViratGang) February 11, 2024
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून विराटची माघार –
दरम्यान, भारतीय संघ सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेलत आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून विराट कोहली याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी दिग्गज फलंदाज संघासोबत जोडला जाणे अपेक्षित होते. पण शनिवारी शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ घोषित झाल्यानंतर विराटचे नाव त्यात नव्हते. म्हणजेच शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमधून देखील त्याने माघार घेतली. यावेळीही विराटने वैयक्तिक कारण देत माघार घेतली.
कसोटी मालिकेतील तिसरा, चौथा आणि पाचवा सामना अनुक्रमे 15 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी आणि 7 मार्च रोजी सुरू होईल. पहिल्या दोन कसोटी सामन्यांनंतर मालिका 1-1 अशा बरोबरीवर आहे.
महत्वाच्या बातम्या –
Rajkot Test । पुजारा संघाला घरी बोलावणार? अश्विनने बोलून दाखवली मनातील इच्छा
Ind vs Aus U19 WC Final : अंडर 19 वर्ल्डकपचा षटकार लावण्यासाठी भारतापुढे 254 धावांचे लक्ष…