भारतीय संघाच्या टी20 संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पुनरागमनाच्या चर्चा थांबत नाहीत. या दोन दिग्गजांच्या पुनरागमनाबाबत क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू सातत्याने आपली मते व्यक्त करत आहेत. यामध्येच आता दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स याचेही वक्तव्य समोर आले आहे. या निवडीमुळे आपल्याला आश्चर्य वाटत नसल्याचे त्याने म्हटले आहे.
पीटीआयशी बोलताना डिव्हिलियर्स (AB de Villiers) म्हणाला, “मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासाठी मी खूप आनंदी आहे. तुमचा सर्वोत्तम संघ पाठवून तुम्हाला टी20 विश्वचषक जिंकायचा आहे आणि तसे व्हायला हवे. परंतु, मला हे देखील समजले आहे की, तरुण आणि सतत टी20 खेळणाऱ्या खेळाडूंकडून संधी हिरावून घेतली जात असल्याची टीका होत आहे.”
डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, “माझ्या कारकिर्दीच्या शेवटीही अशीच परिस्थिती होती. माझ्यासोबत असे घडले नाही पण विराट आणि रोहितला संधी मिळाली आहे आणि हा योग्य निर्णय आहे. तुम्ही तुमच्या अनुभवी खेळाडूंवर विश्वास ठेवू शकता की ते विश्वचषक जिंकतील.”
डिव्हिलियर्सने विराट कोहलीच्या क्रिकेटच्या आवडीबद्दलही सांगितले. तो म्हणाला, “विराटच्या नसानसात क्रिकेट आहे आणि हीच त्याची प्रेरणा आहे. या आवडीपोटी मीही खेळत राहिलो. ज्या दिवशी मला ही आग थंडावल्याचे जाणवले, त्या दिवशी मी खेळातून निवृत्ती घेतली. विराटने आयुष्यात चांगला समतोल राखला आहे. क्रिकेटसोबतच तो कुटुंबासोबत बराच वेळ घालवतो. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर मी करू शकलो नाही, हे त्याने आपले करिअर उत्तम प्रकारे सांभाळले आहे.” (There is talk of stealing opportunities from youngsters but Watch what de Villiers said on Rohit-Virat’s T20 comeback)
हेही वाचा
Ind vs Afg: ‘फक्त माही भाईने सांगितलेलं ऐकतो, त्यामुळे मला गेम फिनीश करणं सोप्पं जातंय’
मोठी बातमी: मिचेल सँटनर कोविड-19 पॉझिटिव्ह; पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 मधून बाहेर