इंग्लंडचा स्टार फलंदाज ओली पोप हैदराबाद कसोटीत चमकला. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघ रविवारी (28 जानेवारी) 28 धावांनी जिंकला. या विजयात पोपचे योगदान मोलाचे राहिले. इंग्लंड संघ डावाच्या अंतराने पराभूत होणार, असे अंदाज व्यक्त केले जाऊ लागले होते. पण अशातच पोपने खेळपट्टीवर पाय रोवले आणि कारकिर्दीतील दुसरी सर्वोत्तम कसोटी खेळी केली. यादरम्यानच भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याशी पोपचा वाद झाल्याचे समोर येथ आहे.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) याच्यातील ही कसोटी मालिका पाच सामन्यांची आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लनेड विजय मिळवून 0-1 अशी आघाडी घेतली. असे असले तरी, सामन्याच्या पहिल्या डावात भारताने 190 धावांची बढत मिळवली होती. इंग्लंड संघ हे लीड पार करेल की नाही, याविषयी शका उपस्थित केली जात होती. पण अशातच ओपी पोल याने 196 धावा कुटल्या. अवघ्या चार धावांनी त्याचे द्विशतक हुकले. पण इंग्लंडला सामन्यात भक्कम स्थितीत पोहोचवण्यासाठी ही खेळी पुरेशी होती. दुसऱ्या डावात इंग्लडने 420 धावा केल्यानंतर भारताला 231 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण भारतीय संघ प्रत्युत्तरात 202 धावांवर सर्वबाद झाला.
हैदराबादमध्ये इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि ओली पोप यांच्यातील संघर्ष चाहत्यांना पाहायला मिळाला. डावातील 82व्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. षटकातील एका चेंडूवर पोप लेग बायच्या धावा घेत होता. पोप खेळपट्टीवर धावत अशतानाच जसप्रीत बुमराहच्या खांद्याला जाऊन धडकला. याच कारणास्तव दोघांमध्ये लाईव्ह सामन्यात शाब्दिक वाद देखील झाला. भारतीय कर्णधार रोहत शर्मा याने मध्यस्थी करून दोन्ही खेळाडूंना आपल्या मार्गाने पाठवून दिले. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.
— Kirkit Expert (@expert42983) January 28, 2024
दरम्यान, या वादानंतर इंग्लंडच्या डावातील 103व्या षटकात बुमराहनेच पोपची शिकार केली. षटकातील पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात पोप त्रिफळाचीत झाला. बुमराह दुसऱ्या डावात भारतासाठी सर्वाधिक चार विकेट्स गेऊ शकला. उभय संघांतील पहिला सामना पाहुण्या इंग्लंडने जिंकल्यानंतर दुसरा सामना यजमान भारतासाठी महत्वाचा झाला आहे. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) विशाखापट्टणममध्ये सुरू होईल. (There was an argument between Ollie Pope and Jasprit Bumrah in the third innings of the Hyderabad Test)
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मिळाला दिलासा, ICC ने घेतला मोठा निर्णय, वाचा संपूर्ण प्रकरण
IND vs ENG । दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडचे पारडे झाले जड, महत्वाचा भारतीय खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता