---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये असणार १० संघ? विदेशी खेळाडूंची वाढू शकते संख्या

On: शुक्रवार, नोव्हेंबर 13, 2020 5:38 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) दिवाळीनंतर आयपीएलमध्ये आणखी दोन संघांचे टेंडर (निविदा) वाढवत आहे. परंतु फ्रँचायझी अनेक नवीन प्रश्न व मागण्या घेऊन तयार आहेत. पुढच्या हंगामात आयपीएल 2021 चा मोठा लिलाव होणे अपेक्षित आहे. फ्रँचायझींची अशी चिंता आहे की जर 8 ते 10 पर्यंत संघ असतील, तर एक व्यवस्थित संघ कसा तयार केला जाईल. काही संघ आधीपासूनच संघर्ष करीत आहेत की संघात परदेशी खेळाडूंच्या सहभागाच्या नियमांमुळे संघ आवश्यक भारतीय खेळाडूंची निवड करण्यास असमर्थ ठरत आहे.

आयपीएलच्या नियमानुसार प्रत्येक संघाला त्याच्या संघात किमान 8 विदेशी खेळाडू ठेवावे लागतात. त्यापैकी केवळ चारच प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकतात. जर संघांची संख्या 8 वरून 10 पर्यंत वाढली, तर संघांना दर्जेदार खेळाडू निवडणे अधिक कठीण जाईल. आतापासून मोठ्या खेळाडूंची जागा निश्चित करण्यासाठी संघ सक्षम दिसत नाहीत. जर आपण बहुतेक आयपीएल संघांकडे पाहिले, तर त्यांच्या संघातले सात ते नऊ खेळाडू जवळपास निश्चित असतात. आणि त्यानंतर प्रत्येक संघ दोन ते तीन खेळाडू लिलावात रोटेट करतात.

आयपीएलमध्ये 8 वरून 10 फ्रँचायझी केल्यास प्रतिभावान खेळाडू आणखी कमी होतील. 8 संघात अद्याप काही दर्जेदार खेळाडू आहेत. यात आणखी दोन संघ तयार केले असल्यास चांगल्या खेळाची काय हमी मिळेल? सध्याचे संघ असा प्रश्न विचारत आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआयने म्हटले आहे की, प्लेइंग इलेव्हनमध्ये चार ते पाच पर्यंत विदेशी खेळाडू खेळवण्याबाबत विचार केला जाईल. ही पद्धत समस्या सोडवेल.

बीसीसीआयच्या अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे की, बहुतेक दर्जेदार परदेशी खेळाडू संपूर्ण हंगामात संधी अभावी बसूनच राहतात, कारण केवळ चार विदेशी खेळाडू खेळू शकतात. अतिरिक्त परदेशी खेळाडू संघात संतुलन राखेल. आयपीएल ही एक स्पर्धा आहे जिथे देशांतर्गत पातळीवर प्रतिभावान खेळाडूंना संधी दिली जाते. त्यामुळे बीसीसीआयच्या आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलला परदेशी खेळाडूंची संख्या वाढविण्याचा निर्णय घेणे सोपे होणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-भारताविरुद्ध होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

-AUS v IND – “मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू”, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले भारतीय क्रिकेटरचे कौतुक

-भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वॉर्नरसोबत ‘हा’ फलंदाज उतरणार सलामीला, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचे संकेत

ट्रेंडिंग लेख-

-…म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच!

-…तेव्हा एमएस धोनीने केलेली ‘ती’ भविष्यवाणी रोहित शर्माने खरी करून दाखवली!

-…आणि हिटमॅन रोहित शर्मा झाला ‘स्टार क्रिकेटर’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---