यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबर पासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सध्या या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने सुरू असून २३ ऑक्टोबर पासून सुपर-१२ फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. तर भारतीय संघाची पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्याच्या प्रसारणामुळे आयसीसीला कोट्यवधींचा फायदा होणार आहे.
भारत-पाकिस्तान लढत पाहण्यासाठी दोन्ही देशातील नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. ज्याचा फायदा आयसीसीला देखील होत असतो. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, यावेळी केवळ या सामन्यावर जाहिराती आणि तिकिटांच्या माध्यमातून बाजारातील सुमारे १२० कोटी पणाला लागू शकतात.
या सामन्यातील प्रत्येक चेंडू ५० लाखांचा असणार आहे. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत हा एकमेव असा सामना आहे, ज्यावर पैशांच्या पाऊस पाडला जाईल. ही गोष्ट आयसीसी आणि मुख्य ब्रॉडकास्टर स्टारला देखील माहीत आहे. त्यामुळेच आयसीसी गेल्या काही विश्वचषक स्पर्धेपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिलीच लढत आयोजित करत आहे.
स्टार ब्रॉडकास्टर्सवर जाहिरात करण्यासाठी पैसे गुंतवलेल्या एका कंपनीच्या अधिकाऱ्याने म्हटले की, “१० सेकंदाच्या जाहिरातीसाठी १० लाख किंमत मोजावी लागत आहे.” संपूर्ण सामन्यात १५० सेकंद (१५ जाहिराती) दिले जातात. स्टारकडे एकूण १६ मुख्य आणि सहाय्यक स्पॉन्सर्स आहेत. सहाय्यक स्पॉन्सर्सला ९० सेकंद दिले जात आहेत. या स्पॉन्सर्सव्यतिरिक्त १० टक्के जागा इतर जाहिरातदारांसाठी शिल्लक ठेवण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४० ते ५० टक्के प्रीमियम वसूल केले जाणार आहे, ज्यामुळे त्यांना १५ ते १६ लाख रुपये द्यावे लागतील.
तसेच सामन्याचे सर्व तिकीट विकले गेले आहेत. यामध्ये सर्वात स्वस्त तिकीट १५० दिरहाम म्हणजे जवळपास ३ हजार रुपये इतके होते. परंतु आता हेच तिकीट ब्लॅकने लाखो रुपयांना विक्री केले जात आहे. सामान्य तिकिटांचे दर ३०००, ६३०० आणि १५७०० इतके आहेत. तर हॉस्पिटॅलिटी तिकिटांचे दर २७ हजार, ६३ हजार, १ लाख ९० हजार आणि २ लाख ३३ हजार रुपये इतके आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकातील ‘गोलंदाजीचा किंग’ बनला शाकिब, नोंदवला विश्वविक्रम; भारतीय बॉलर आसपासही नाहीत
टी२० विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडला ‘४४० व्होल्टचा झटका’, सर्वात महत्त्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त
पीएनजीविरुद्ध ३ धावांनी शाकिबचे अर्धशतक हुकले, पण टी२० विश्वचषकातील ‘या’ विक्रमांत रोहितला पछाडले






