पाच वेळा आयपीएलचा विजेता आणि गतविजेता मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने पहिल्या पाच वर्षांत या स्पर्धेत काही खास कामगिरी केली नाही, परंतु २०११ मध्ये रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर हा संघ बदलला. या संघाने २०१३ मध्ये पहिले विजेतेपद आणि मागील वर्षी पाचवे जेतेपद जिंकले होते. मुंबई इंडियन्सची सर्वात मोठी ताकद म्हणजे युवा खेळाडूंना सामना जिंकणारा खेळाडू बनविणे. जसप्रीत बुमराह, हार्दिक, कृणाल आणि बरेच तरुण खेळाडू असे आहेत जे वेळोवेळी या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आले आहेत.
आयपीएल २०२१ ची सुरुवात ९ एप्रिलपासून होणार आहे आणि मुंबई इंडियन्सचा संघ आगामी हंगाम जिंकण्यासाठी महत्त्वपूर्ण दावेदार आहे. मुंबई इंडियन्सचा संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे उत्कृष्ट मिश्रण असून कोणत्याही संघाला हरविण्याची क्षमता या संघात आहे.
गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत जसप्रीत बुमराह या संघाचा सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू होता. यावेळीसुद्धा संघात असे अनेक दर्जेदार गोलंदाज आहेत, ज्यांच्याकडे आगामी हंगामात संघासाठी सर्वाधिक बळी घेण्याची क्षमता आहे. या लेखात आपण अशा ३ गोलंदाजांविषयी चर्चा करणार आहोत, जे या हंमात मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक बळी मिळवू शकतात.
ट्रेंट बोल्ट
न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट सध्या जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. आयपीएलमध्येही बोल्टने आपल्या गोलंदाजीने अनेक फलंदाजांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला आहे. मागील हंगामात मुंबई इंडियन्सला ट्रॉफी जिंकवण्यात त्याचे महत्त्वपूर्ण योगदान होते. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी बोल्टने २५ बळी आपल्या नावे केले होते. यावेळीही बोल्ट त्याच लयीत दिसला तर, तो या हंगामात आपल्या संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा खेळाडूही बनू शकतो.
पियुष चावला
आयपीएल २०२० च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने पीयूष चावलाला चेन्नईच्या हळू खेळपट्ट्यांचा फायदा घेण्यासाठी त्यांच्या संघात सामील केले. पण, मागील हंगाम युएईमध्ये खेळला गेला आणि हा गोलंदाज तितका प्रभावी ठरला नाही. याच कारणास्तव चेन्नईने त्यांना सोडले. लिलावात चावला मुंबई इंडियन्ससारख्या संघाशी जोडला गेला असला तरी, आता मुंबईला त्यांचे बरेच सामने चेन्नईत खेळावे लागणार आहेत आणि चावलासारखा अनुभवी फिरकीपटू संघात आहे, हे मुंबईकरांसाठी खूप फायदेशीर आहे. चावला त्याच्या फिरकी गोलंदाजीमुळे यंदाच्या हंगामात मुंबईकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरू शकतो.
जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराहला सध्या मर्यादित षटकांचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणतात. बुमराहने गेल्या कित्येक वर्षांपासून आपली क्षमता सिद्ध केली आहे आणि आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिग्गज फलंदाजांना मस्त केले आहे. बुमराह हा आयपीएलच्या मागील सत्रात मुंबईचा सर्वात यशस्वी आणि या स्पर्धेतील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. बुमराहने आयपीएल २०२० मध्ये १५ सामन्यांत २७ बळी घेतलेले. या हंगामात बुमराहला पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी करून मुंबईसाठी सर्वाधिक बळी घेण्याची संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हे’ तिघे बनू शकतात आयपीएलमध्ये चेन्नईसाठी ‘रनवीर’
आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा बनवणारे फलंदाज
“असे खूप भारतीय खेळाडू आहेत, ज्यांना विदेशी फ्रँचायझी टी२० लीगमध्ये खेळायचे आहे”, या दिग्गजाचा दावा