क्रिकेटप्रेमी सध्या ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो सामना म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२मधील अंतिम सामना होय. हा सामना येत्या २९ मे रोजी पार पडणार आहे. या सामन्यातील एक संघ आधीच ठरला आहे. मात्र, दुसरा संघ लवकरच ठरणार आहे, ते दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातून. दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळला जाणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, त्या संघाला अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. यानंतर चाहत्यांना पुढील हंगामाची आतुरता राहील.
या हंगामात काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, काही खेळाडू आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. यामध्ये काही विदेशी खेळाडूंचाही समावेश आहे, ज्यांनी यावेळी संधी मिळूनही त्याचा पुरेपूर फायदा उचलला नाही. अशात संघ पुढील हंगामाच्या तयारीला लागतील. कदाचित संघ यंदा खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंबाबतही निर्णय घेतील. यामध्ये परदेशी खेळाडू सपशेल फ्लॉप ठरले आहेत. चला तर जाणून घेऊया त्या ३ खेळाडूंबद्दल, ज्यांना यंदाच्या हंगामातील कामगिरीनंतर कदाचितच पुढच्या हंगामात खेळण्याची संधी मिळेल.
‘हे’ ३ परदेशी खेळाडू कदाचितच दिसतील आयपीएल खेळताना
मॅथ्यू वेड
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवणाऱ्या गुजरात टायटन्स संघाच्या एका खेळाडूचा समावेश आहे. त्यांनी मेगा लिलावात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड (Matthew Wade) याला निवडले होते. वेडचा बिग बॅश लीगमधील फॉर्म पाहता, गुजरातने त्याच्यावर विश्वास दाखवला होता. गुजरातने त्याला खूप संधी दिली. मात्र, तो आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला. वेडने या हंगामात ९ सामन्यात फलंदाजी केली. मात्र, १६.५६च्या सरासरीने तो फक्त १४९ धावाच करू शकला. त्याच्या या प्रदर्शनानंतर आता गुजरात टायटन्स संघ त्याला लिलावात मुक्त करू शकता. त्यानंतर कदाचितच तो पुढे आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.
ऍरॉन फिंच
यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलियाचा टी२० विश्वविजेता कर्णधार ऍरॉन फिंच यालाही मेगा लिलावात कोणत्याही संघाने संधी दिली नव्हती. त्यानंतर आयपीएल सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाने ऍरॉन फिंच (Aaron Finch) याला बदली खेळाडू म्हणून आपल्या ताफ्यात सामील केले होते.