भारत, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांप्रमाणे आता श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही आपल्या देशात टी२० स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या टी२० स्पर्धेचे नाव लंका प्रीमियर लीग असे आहे. या स्पर्धेची सुरुवात होण्यास आता केवळ २ दिवसांचा कालावधी राहिला आहे. म्हणजेच या स्पर्धेची सुरुवात २६ नोव्हेंबरपासून होत आहे. आनंदाची बातमी अशी की, भारतीय संघाचे चार माजी खेळाडूही या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत.
खरं तर सोमवारी (२३ नोव्हेंबर) श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पाचही संघांच्या स्क्वॉडची घोषणा केली आहे. यातील ३ वेगवेगळ्या संघांमध्ये ४ भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या ४ भारतीय खेळाडूंमध्ये माजी अष्टपैलू इरफान पठाण, मध्यमगती गोलंदाज मुनाफ पटेल, वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी आणि मनप्रीत सिंग गोनी यांच्या नावाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त श्रीलंका क्रिकेट बोर्डाने इतर भारतीय खेळाडूंशीही संपर्क केला होता.
एलपीएलमध्ये गाले ग्लेडिएटर्स, जाफना स्टॅलियन्स, कँडी टस्कर्स, दांबुला विकिंग, कोलंबो किंग्ज या ५ संघांचा समावेश आहे. यातील कँडी टस्कर्स संघात इरफान पठाण आणि मुनाफ पटेल या खेळाडूंना सामील केले आहे. हा संघ बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि वडील सलीम खान यांचा आहे.
UPDATE 🗣
Kandy Tuskers Squad. 👥 🏆5 Teams – 1 Trophy#එක්වජයගමූ #wintogether pic.twitter.com/OltC2xJsMa
— LPL – Lanka Premier League (@LPLT20) November 23, 2020
दुसरीकडे दांबुला संघात सुदीप त्यागीचा समावेश आहे. त्याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, तर कोलंबो संघात मनप्रीत सिंगला सामील करण्यात आले आहे.
UPDATE 🗣
Dambulla Viiking Squad. 👥 🏆5 Teams – 1 Trophy#එක්වජයගමූ #wintogether pic.twitter.com/JYt0XgOyh8
— LPL – Lanka Premier League (@LPLT20) November 23, 2020
UPDATE 🗣
Colombo Kings – Squad 👥 🏆5 Teams – 1 Trophy#එක්වජයගමූ #wintogether pic.twitter.com/RPG7EF8H16
— LPL – Lanka Premier League (@LPLT20) November 23, 2020
या स्पर्धेची सुरुवात २६ नोव्हेंबरपासून होत आहे आणि यातील अंतिम सामना १६ डिसेंबर रोजी खेळला जाईल. या स्पर्धेतील सर्व सामना हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे इंटरनॅशनल स्टेडिअममध्ये खेळवण्यात येणार आहेत. आयपीएल २०२०प्रमाणे लंका प्रीमियर लीगमध्ये श्रीलंका क्रिकेट बोर्डाने क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने ठेवले नाहीत. त्यांनी केवळ २ उपांत्य सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. हे सामने गुणतालिकेतील अव्वल ४ संघांमध्ये होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आफ्रिदीकडून मोठी चूक, लंका प्रीमियर लीगमधील सामन्याला मुकण्याची शक्यता
लंका प्रीमियर लीगमध्ये ‘या’ संघाकडून खेळणार ‘स्टेन गन’, ट्वीट करत दिली माहिती
ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये १७६ सामने खेळलेल्या खेळाडूला मिळाली लंका प्रीमियर लीगमध्ये संधी