खरंतर क्रिकेटचा इतिहास खूप जुना आहे. क्रिकेटचा खेळ जवळजवळ १४३ वर्षांपूर्वी सुरू झाला. १९७१ मध्ये कसोटी क्रिकेटपासून क्रिकेट खेळाला सुरुवात झाली आणि पुढे त्याचे वनडे क्रिकेट सुरु झाले. वनडे क्रिकेट बर्याच वर्षांपासून सुरु आहेच, परंतु त्यातही आता क्रिकेटला टी-२० चे छोटे स्वरूप देण्यात आले आहे.
क्रिकेट क्षेत्रातील हे छोटे स्वरूप आता चाहत्यांच्या पसंतीचा क्रिकेट प्रकार झाला आहे. आज एकापेक्षा एक महान खेळाडू या टी-२० क्रिकेट प्रकारात दिसतात. परंतु या खेळाडूंमध्ये मोजक्याच खेळाडूंना महान खेळाडू म्हणून ओळखले जाते. या लेखात ते ५ फलंदाज पाहूया की जर ते टी-२० क्रिकेटमध्ये काही वर्षे राहिले असते तर त्यांची गणना महान खेळाडूंमध्ये केली गेली असती.
टी-२० क्रिकेटमध्ये हे ५ खेळाडू उत्तम ठरू शकले असते
विव रिचर्डसन (Viv Richardson)
वेस्ट इंडीज क्रिकेटमधील सर्वांत महान फलंदाजांपैकी एक म्हणजे विव रिचर्डसन. रिचर्डसन हे त्याच्या काळातील सर्वात स्फोटक फलंदाज होते. ते ८० च्या दशकात अशी फलंदाजी करायचे की गोलंदाजांमध्ये भय स्पष्टपणे दिसून यायचे. विव रिचर्डसनने गोलंदाजांवर आपले अधिराज्य गाजवले होते. कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विव रिचर्डसनच्या काळात जर टी-२० क्रिकेट असते, तर नक्कीच ते या टी-२० प्रकारातही महान फलंदाज ठरले असते. पण त्या काळात टी-२० क्रिकेटचे नाव देखील नव्हते.
रिकार्डो पॉवेल (Ricardo Powell)
सध्या वेस्ट इंडीज क्रिकेटमधील टी-२० क्रिकेटच्या स्वरूपात असंख्य खेळाडू खेळत आहेत. पूर्वी विंडीजकडे असे काही फलंदाज होते की आज त्यांनी टी-२० क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व नक्की गाजवले असते. त्या फलंदाजांपैकी एक म्हणजे वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज रिकार्डो पॉवेल. ब्रायन लाराच्या काळात वेस्ट इंडिज संघात खेळणारा रिकार्डो पॉवेल हा एक अत्यंत विस्फोटक फलंदाज मानला जात होता. परंतु, जेव्हा रिकार्डो पॉवेल याने निवृत्ती घेतली. काही वर्षाने टी-२० क्रिकेट सुरू झाले. त्याच्या काळात टी-२० क्रिकेटचे प्रारूप असते तर तो आज एक टी-२० क्रिकेटचा महान फलंदाज नक्की ठरला असता.
सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya)
श्रीलंका क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार सनथ जयसूर्या याने बरीच वर्ष श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. क्रिकेट इतिहासातील सर्वात आक्रमक फलंदाजाबद्दल बोलताना माजी सलामीवीर सनथ जयसूर्याचे नाव प्रथम घेतले जाते. सनथ जयसूर्याने संपूर्ण कारकीर्दीत उत्तम फलंदाजी केली. सनथ जयसूर्या खूप स्फोटक फलंदाजी करायचा. त्यांची टी-२० क्रिकेट कारकीर्द छोटीशी राहिली पण या छोट्या कारकिर्दीत तो चमकला होता. जयसूर्याने जास्त काळ टी-२० चे स्वरुप खेळले नाही, अन्यथा तो टी-२० मधील दिग्गज फलंदाजांपैकी एक ठरला असता.
लांस क्लूसनर (Lance Klusener)
दक्षिण आफ्रिकेचा माजी अनुभवी अष्टपैलू लांस क्लूसनर त्याच्या काळात एक जबरदस्त खेळाडू राहिला आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने आपला ठसा उमटविला होता. लांस क्लूसनरमध्ये ज्या प्रकारची आक्रमक खेळण्याची क्षमता होती, ती पाहता टी-२० क्रिकेट प्रकारातील तो अत्यंत धोकादायक खेळाडू ठरला असता. लांस क्लूसनरने दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून वनडे क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला. त्यावेळी लांस क्लूसनर टी-२० क्रिकेटचा भाग असता तर आज क्लूझनर टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गणला गेला असता.
अब्दुल रझाक (Abdul Razzaq)
अब्दुल रझाक हा पाकिस्तान क्रिकेट संघातील एकअष्टपैलू खेळाडू होता. पाकिस्तान संघात इम्रान खानसारखा मोठा अष्टपैलू खेळाडू नाही. पण नंतर पाकिस्तान संघाला अब्दुल रझाकच्या रुपाने जबरदस्त अष्टपैलू खेळाडू मिळाला. पाकिस्तानच्या संघात अब्दुल रझाक बराच काळ क्रिकेट खेळला. अब्दुल रझाक संघासाठी अत्यंत उपयुक्त मानला जात होता कारण त्याने गोलंदाजीबरोबरच फलंदाजी मधेही उत्तम कामगिरी केली होती. पण अब्दुल रझाकसारखा अष्टपैलू खेळाडू टी-२० क्रिकेट प्रारूप खेळू शकला नाही. जर रझाक टी-२० क्रिकेट फॉर्मेट खेळत असता तर त्याला या फॉरमॅटसाठी सर्वात नामांकित खेळाडू म्हणून निवडले गेले असते. पण दुर्दैवाने, रझाक कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असताना टी-२० क्रिकेटला सुरुवात झाली.
ट्रेंडिंग लेख –
एकहाती सामना बदलायची ताकद ठेवणारा प्रत्येक संघाचा दमदार परदेशी खेळाडू
आयपीएलमधील असे ५ मोठे विक्रम जे मोडणे आहे अशक्य
२०२०मध्ये बेंगलोर शंभर टक्के जिंकणार आयपीएल परंतू या ३ सुधारणा केल्यावरच
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई सुपरकिंग्स पुढचा कर्णधार कोण होणार? अष्टपैलू खेळाडूंनी केला खुलासा
पाकिस्तान संघाची वार्षिक कमाई “हिट मॅन” च्या IPL कमाईच्या आहे अर्धी
धोनीच्या नेतृत्वाचा डीजे ब्राव्हो झाला फॅन, म्हणाला सीएसके माझे…