एखाद्या यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात त्याने स्वतः घेतलेले कष्ट आणि काही नशिबाचा हातभार असतो. या दोन गोष्टींच्या दरम्यान, ती यशस्वी व्यक्ती त्याच्या आयुष्यात थोडाफार अंधश्रद्धेवर देखील विश्वास ठेवते. आजच्या क्रीडा जगात असे बरेच खेळाडू आहेत जे अंधश्रद्धेवर थोडाफार विश्वास ठेवतात.
असो, अंधश्रद्धा ही फक्त एक मानसिकता आहे, परंतु जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा प्रश्न येतो तेव्हा त्यात असे बरेच खेळाडू येतात, जे सामन्यादरम्यान अशा कृती करतात, ज्यामुळे त्यांना वाटते की त्यांना यश मिळेल.
आज आपण भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, ज्यांनी संपूर्ण कारकीर्दीत अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला.
अंधश्रद्धा असलेले भारताचे हे ५ दिग्गज खेळाडू
१. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आतापर्यंतच्या क्रिकेट युगातील महान फलंदाज आहे. क्रिकेटच्या कसोटी आणि वनडे स्वरूपात सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रम आहेत.
पण सचिन तेंडुलकरसारखा खेळाडूही एक मोठा अंधश्रद्धाळू होता. तो नेहमीच पहिला डाव्या पायात पॅड घालत असे. त्याने ते स्वतःसाठी भाग्यवान मानले होते. एवढेच नव्हे तर २०११ च्या विश्वचषकात त्याने जुन्या बॅटला ठीक करून त्याच जुन्या बॅटने संपूर्ण स्पर्धा खेळली होती.
२. सौरव गांगुली (Sourav Ganguly)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा एक महान कर्णधार आणि जबरदस्त फलंदाज होता. सौरव गांगुलीने कित्येक वर्षे भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच त्याने अनेकदा अष्टपैलू कामगिरीने उत्कृष्ट प्रदर्शन देखील केले. “गॉड ऑन द ऑफ-साईड” म्हणून त्यांची ओळख होती. त्यानेही आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रम केले आहेत.
सौरव गांगुलीसुद्धा त्याच्या कारकिर्दीत अंधश्रद्धाळू होता. खेळताना त्याने आपल्या खिशात आपल्या गुरुजींचा फोटो ठेवायचा. त्याला तो स्वतःसाठी चांगले मानत असे.
३. राहुल द्रविड (Rahul Dravid)
माजी कसोटी फलंदाज राहुल द्रविड हा कसोटी क्रिकेट इतिहासातील उत्कृष्ठ फलंदाज होता. वनडे क्रिकेटमध्येही राहुल द्रविडने उत्तम खेळी केल्या आहेत. राहुल द्रविडची कारकीर्द जबरदस्त होती. त्याने अनेक सामन्यांमध्ये चांगली खेळी करत भारताचा विजय निश्चित केला.
पण राहुल द्रविडही थोडाफार अंधश्रद्धाळूही होता. द्रविड हा एक चांगला फलंदाज होता, परंतु कसोटी सामन्यात नेहमीच नवीन कपडे परिधान करणे असो किंवा फलंदाजीसाठी तयार होताना पहिला उजवा पायात थाई पॅड बांधणे असो यासह अनेक अंधश्रद्धांवर त्याचा विश्वास होता. तसेच त्याने कोणतीही सामन्याची सुरुवात करताना नवीन बॅट वापरली नाही.
४. विराट कोहली (Virat Kohl)
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आज ज्या उंचीवर आहे त्या ठिकाणी प्रत्येक खेळाडू पोहोचण्याचे स्वप्न पाहतो. आजच्या युगात विराट कोहली हा क्रिकेट जगातील सर्वात महान फलंदाज मानला जातो. आपल्या कारकीर्दीच्या प्रत्येक टप्प्यात विराट कोहलीने एक-एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
कोहली मेहनत जरी खूप घेत असला तरी आपल्याला आश्चर्य वाटेल की त्याच अंधश्रद्धेवर देखील विश्वास आहे. ज्यामध्ये कोहली कारकिर्दीच्या सुरुवातीला जे ग्लोव्ह्ज घालून खेळाला आणि धावा जमवल्या तेच ग्लोव्ह्ज तो पुन्हा पुन्हा घालायचा. तो या जुन्या ग्लोव्ह्जला बर्यापैकी भाग्यवान मानत असे. परंतु, धोनीने त्याला नवीन ग्लोव्ह्ज घालण्यास भाग पाडल्यामुळे त्याने गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार बंद केला.
५. एमएस धोनी (MS Dhoni)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने खूप मोठं यश प्राप्त केलं आहे. फलंदाज असो वा यष्टीरक्षक असो वा कर्णधार, धोनीने जबरदस्त कामगिरी करून यश मिळवले आहे. एमएस धोनी आपल्या कारकिर्दीतील महानतेच्या शिखरावर पोहोचला. त्याने संपूर्ण कारकिर्दीत एक एकाच अंधश्रद्धा ठेवली.
धोनीने सुरुवातीपासून आपली जन्मतारीख म्हणजे ७ क्रमांकाला खूप भाग्यवान मानतो. तो कधीही हा नंबर सोडू इच्छित नाही. तो ७ नंबरची जर्सी देखील परिधान करतो आणि इतर कामांमध्येही तो ७ क्रमांकाला खूप विशेष मानतो.
वाचनीय लेख –
धोनीवर लावला जातो या पाच खेळाडूंचे करियर संपविल्याचा आरोप
आपल्या शेवटच्या सामन्यात सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणारे २ भारतीय कर्णधार
सर्वात वेगवान चेंडू टाकणारे ३ भारतीय गोलंदाज