क्रिकेट हा भारतातील सर्वात आवडता खेळ आहे. क्रिकेटमध्ये करिअर करणारा प्रत्येक खेळाडू एका रात्रीत देशभरात प्रसिद्ध बनतो. जो खेळाडू आपल्या पदार्पण सामन्यात किंवा पदार्पण मालिकेत भारतासाठी खेळतो आणि चांगली कामगिरी करतो, लोक त्याला डोक्यावर घेतात. भारतातील क्रिकेटपटूंची लोकप्रियता चित्रपट व्यक्तिमत्त्वांपेक्षा जास्त आहे. भारतातील बऱ्याचशा लोकांना क्रिकेटपटूंच्या जीवनातून खूप प्रेरणा मिळते. भारतीय संघातही असे अनेक क्रिकेटपटू आहेत, जे गरिबीतून बाहेर आले आणि त्यांची क्रिकेटबद्दलची आवड जोपासत त्यातच कारकिर्द घडवली. हे खेळाडू आजच्या काळात खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व बनले आहेत. चला अशा 5 क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊया, जे गरिबीतून बाहेर आले आणि त्यांनी भारतीय संघाचे नाव उंचावले.
वीरेंद्र सेहवाग
नजाबगडचा नवाब वीरेंद्र सेहवाग अनेक फलंदाजांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीने गोलंदाजांना ‘षटकाराचे पाणी पाजणारे’ वीरेंद्र सेहवाग हे आजच्या काळात भारतीय क्रिकेटमध्ये केवळ मोठे नावच नाही, तर जागतिक क्रिकेटमध्ये त्यांचे खूप वर्चस्व आहे.
दुसरीकडे, जर आपण वीरेंद्र सेहवागच्या बालपणीच्या दिवसांबद्दल बोललो तर त्याने आपले बालपण बरेच गरिबीत घालवले आहे. त्याचे वडील पिठाच्या गिरणीचे कंत्राटदार तसेच गव्हाचे व्यापारी होते. त्यांच्या घरातील उत्पन्न खूप कमी होते. त्यात त्यांच्या घरात ५० लोक राहत होते.
हरभजन सिंग
आपल्या फिरकी गोलंदाजीने जगातील महान फलंदाजांना नाचवणारे हरभजन सिंग हे केवळ भारतीय क्रिकेटचे चमकणारे तारेच नाहीत, तर ते जागतिक क्रिकेटमधील एक मोठे नाव देखील आहेत. भज्जी सध्या खूप श्रीमंत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा त्याच्या घरात पैसे नसायचे. भज्जीचे वडील बस चालक होते. त्याच्या वडिलांनी त्याला बस चालवून त्याचे पालनपोषण केले.
रवींद्र जडेजा
आपल्या क्षेत्ररक्षण आणि फिरकी गोलंदाजीने जगात नाव कमावलेला रवींद्र जडेजा केवळ एक श्रीमंत क्रिकेटपटूच नाही तर एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. पण भारतीय संघात स्थान मिळवण्याचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. जडेजाचे वडील होमगार्ड होते. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की त्यांच्या घरची आर्थिक स्थिती कशी असावी.
झहीर खान
जर झहीर खानला भारतीय संघाचा महान गोलंदाज म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही. झहीर खानने तिन्ही स्वरुपामध्ये भारतासाठी चमकदार गोलंदाजी केली आहे. झहीर सध्या मुंबईत एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतो. पण एक काळ असा होता जेव्हा तो त्याच्या काकूंबरोबर हॉस्पिटलच्या एका लहान खोलीत राहायचा.
त्याचे कुटुंब अत्यंत गरीब होते. पण झहीर खानने आपली क्रिकेट कारकीर्द गरिबीतून निर्माण केली आणि आता तो भारताचा महान वेगवान गोलंदाज आहे.
उमेश यादव
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. उमेश यादव अजूनही भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा एक भाग आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की उमेश यादव अत्यंत गरीब कुटुंबातील होता. त्याचे वडील कोळशाच्या खाणीत काम करत होते. उमेश यादवची मेहनत होती म्हणून तो आज भारतीय संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित टी२० क्रिकेटमध्ये ४०० षटकार ठोकणारा पहिला भारतीय, पाहा इतर ‘सिक्सर किंग्ज’ची नावे
‘या’ ६ संघांचे कसोटी अन् मर्यादित षटकांचे आहेत वेगवेगळे कर्णधार, भारताची जोडी असेल सर्वात तगडी
गौतम गंभीर का ठरला टीम इंडियासाठी संकटमोचक, हे दाखवून देणाऱ्या ३ खेळी






