येत्या १८ जुलैपासून भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. भारतीय वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असल्यामुळे हा द्वितीय श्रेणीचा संघ श्रीलंकेला रवाना करण्यात आला आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत कुठल्या युवा खेळाडूंना संधी मिळेल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
When #TeamIndia went
Lights ⚡️
Camera 📸
Action 🎬The excitement is building up ahead of the ODI series against Sri Lanka 👌 👌 #SLvIND pic.twitter.com/fo1HrkTR8B
— BCCI (@BCCI) July 14, 2021
या दौऱ्यावर देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नीतीश राणा, कृष्णप्पा गौतम, चेतन सकारिया आणि वरून चक्रवर्ती या युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. हा दौरा आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे ज्या खेळाडूंना या मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळेल, ते आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. (These 6 Indian player’s can get a chance in the series against srilanka)
6⃣ New Faces 🙌
6⃣ Matches 👌
Who are you excited to watch in action the most❓#TeamIndia #SLvIND pic.twitter.com/K0I4KXNeS3
— BCCI (@BCCI) July 13, 2021
शिखर धवनसाठी सुवर्णसंधी
कर्णधार शिखर धवनला जर आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित करायचे असेल तर या मालिकेत त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. शिखर धवनने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण १६ वनडे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला ९८३ धावा करण्यात यश आले आहे. तसेच त्याने श्रीलंका संघाविरुद्ध ४ शतक आणि ५ अर्धशतक झळकावले आहेत.
हार्दिक पंड्याला पुनरागमन करण्याची संधी
गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पंड्या चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरला आहे. जर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला टी -२० विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवायचे असेल तर या मालिकेत त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. त्याला गेल्या काही सामन्यात गोलंदाजी करता आली नाही. परंतु आगामी श्रीलंका दौऱ्यावर त्याला गोलंदाजीमध्ये देखील मोलाचे योगदान द्यावे लागणार आहे.
आपल्या कामगिरीने भुवनेश्वर निवडकर्त्यांना देणार प्रत्युत्तर
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारला संघात स्थान देण्यात आले नव्हते. या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याची कमतरता देखील जाणवली होती. आगामी श्रीलंका दौऱ्यावर तो उपकर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. त्यामुळे या मालिकेत तो चांगली कामगिरी करून निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
स्टार्क-रसेलमध्ये वर्चस्वाची लढाई, ६ चेंडूत ११ धावांची गरज असताना ऑसी दिग्गजाने ‘अशी’ मारली बाजी
तब्बल १९ हजारपेक्षा जास्त धावा चोपणाऱ्या दिग्गजावर मोठी जबाबदारी, ‘या’ संघाचा बनला हेड कोच
ब्रेकिंग! इंग्लंड दौऱ्यातील कोरोना संक्रमित भारतीय खेळाडूचे नाव आले पुढे, पाहा कोण आहे तो?