दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये नुकताच ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह भारतीय संघाने ही मालिका १-२ ने गमावली आहे. पुन्हा एकदा भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजय मिळवण्याचे स्वप्नं अपूर्ण राहिले आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या सामन्यात ११३ धावांनी विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.
या मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. ज्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत केएल राहुल एकमेव फलंदाज ठरला. केएल राहुलने (KL Rahul) ३ कसोटी सामन्यात २२६ धावा केल्या, तर दक्षिण आफ्रिका संघाकडून किगन पीटरसनने (Keegan Peterson) २७६ धावा केल्या. तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
हे आहेत दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील (२०२१-२२) सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१) २७६ धावा – किगन पीटरसन
२) २३५ धावा – डीन एल्गर
३) २२६ धावा – केएल राहुल
४) २२१ धावा – टेंबा बावुमा
५) १८६ धावा – रिषभ पंत
दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असते. त्याचा पुरेपूर फायदा भारतीय गोलंदाजांनी घेतला. भारतीय संघाकडून मोहम्मद शमी (Mohammad Shami) हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सर्वाधिक १४ गडी बाद केले, तर या मालिकेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा मान मिळवला तो कागिसो रबाडाला (kagiso rabada). त्याने या मालिकेत २० गडी बाद केले.
हे आहेत दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील (२०२१-२२) सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज
१) २० गडी – कागिसो रबाडा
२) १९ गडी – मार्को जेंसन
३) १५ गडी – लुंगी एन्गिडी
४) १४ गडी – मोहम्मद शमी
५) १२ गडी – शार्दुल ठाकूर
महत्वाच्या बातम्या :
विराटची ‘कासवगती’! कर्णधार म्हणून नकोसा विक्रम केला नावावर
पुजाराकडून ‘तो’ झेल सुटला अन् भारतीयांच्या आशेला सुरूंग लागला, पाहा व्हिडिओ
हे नक्की पाहा: