केपटाऊन। शुक्रवारी (१४ जानेवारी) दक्षिण आफ्रिका संघाने भारताविरुद्ध न्यूलँड्स येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने ३ सामन्यांची कसोटी मालिका २-१ फरकाने आपल्या नावावर केली. दरम्यान, या सामन्याच्या अखेरच्या डावात चेतेश्वर पुजारा याने (Cheteshwar Pujara) एक महत्त्वाचा झेल सोडला (drops catch). त्याच्या क्षेत्ररक्षणावर सध्या टीका होत आहे.
या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत दोन्ही संघांसाठी विजयाच्या आशा कायम होत्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला २१२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसाखेर २ बाद १०१ धावा केल्या होत्या. त्यामुळे अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला १११ धावांची आणि भारताला ८ विकेट्सची गरज होती. मात्र, रस्सी वॅन डर ड्यूसेन आणि किगन पीटरसन (keegan Petersen) यांनी दक्षिण आफ्रिकेला चौथ्या दिवशी भक्कम सुरुवात दिले.
असे असतानात मोक्याच्या क्षणी पुजाराने खेळपट्टीवर अर्धशतकी खेळी करत स्थिरावलेल्या पीटरसनचा महत्त्वाचा झेल सोडला. झाले असे की, जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत असलेल्या ४० व्या षटकाचा चौथा चेंडू पीटरसनच्या बॅटची कड घेत मागे गेला. यावेळी पुजारा पहिल्या स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. पण, त्याच्या हातून पीटरसनचा झेल सुटला. त्यावेळी पीटरसन ५९ धावांवर खेळत होता. तसेच, दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या १२६ धावा अशी होती.
पुजाराने झेल सोडल्यानंतर भारतीय गोटात एकदम शांतता पसरलेली दिसली, मैदानावर नेहमी उत्साही असलेल्या विराट कोहलीनेही नाराज होऊन काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याचा हा झेल भारताला महाग ठरल्याचे अनेकांनी म्हटले, कारण जर त्याचा झेल पुजाराने घेतला असता, तर दक्षिण आफ्रिकेची लय बिघडवत दबाव निर्माण करता आला असता.
https://twitter.com/rudhranandu/status/1481929457682481158
पीटरसनने या जीवदानाचा फायदा घेत ११३ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. तसेच त्याने रस्सी वॅन डर ड्यूसेनबरोबर ५४ धावांची महत्त्वाची भागीदारीही केली. पीटरसनला ४७ व्या षटकात शार्दुल ठाकूरने त्रिफळाचीत केले. पण, तोपर्यंत ड्यूसेन खेळपट्टीवर स्थिरावला होता. त्यामुळे त्याने तेंबा बाऊमासह नाबाद अर्धशतकी खेळी करत सामना दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. ड्यूसेनने नाबाद ४१ धावांची आणि बाऊमाने नाबाद ३२ धावांची खेळी केली.
#Pujara dropped Peterson 😔#INDvsSA pic.twitter.com/I9rPtFjToT
— SChrödinger's 🜃 (@NaveedShafi15) January 14, 2022
https://twitter.com/i_aditya61/status/1481927326904766464
तत्पूर्वी, या सामन्यात भारताचा पहिला डाव २२३ धावांवर संपुष्टात आला होता. तर, भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात केवळ २१० धावांवर रोखत १३ धावांची आघाडी संघाला मिळवून दिली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताला १९८ धावाच करता आल्या, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर २१२ धावांचे आव्हान देता आले.
पुजारा फलंदाजीतही फ्लॉप
पुजारा गेल्या अनेक दिवसांपासून फलंदाजीतही संघर्ष करताना दिसत आहे. त्याला या सामन्यातही मोठी खेळी करता आली नाही. पहिल्या डावात तो खेळपट्टीवर स्थिरावला असताना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो ४३ धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात तर तो ९ धावाच करू शकला.
महत्त्वाच्या बातम्या –
“आता तरी रहाणे-पुजाराच्या जागा मोकळ्या होतील”
खालीही पडला अन् क्लीन बोल्डही झाला! लॅब्युशेनची विकेट पाहून संघसहकाऱ्यांनाही आवरले नाही हसू
सर्वकालीन महान सलामीवीराने रिषभला दिली ‘स्टँडिंग ओव्हेशन’; शतकी खेळीबाबत म्हणाला…
व्हिडिओ पाहा – १००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे?