---Advertisement---

बांगलादेशला क्लीन स्वीप देऊनही ‘या’ पाच गोष्टींमुळे टीम इंडिया टेन्शनमध्ये, वेळेत कराव्या लागतील सुधारणा

Team India
---Advertisement---

भारतीय संघाने रविवारी कसोटी मालिकेत बांगलादेशला क्लीन स्वीप दिला. बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या सामन्यात 188 धावांनी विजय मिळवला, तर दुसरा सामना संघाने 3 विकेट्स राखून नावावर केला. यजमानांनी धूळ चारली असली, तरी देखील संघाला येत्या काळात काही गोष्टींवर काम करावे लागणार आहेत. आपण या लेखात अशा पाच गोष्टींवर नजर टाकू, ज्यावर संघाला लवकरात लवकर निर्णय घेत सुधारणा करणे आवश्यक आहे.

1. सलामीवीर जोडी कोण?
बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत दुखापत झाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी मालिकेत खेळू शकला नाही. रोहितच्या अनुपस्थितीत कसोटी मालिकेत केएल राहुल (KL Rahul) आणि शुबमन गिल यांना डावाची सुरुवात केली. गिलने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक केले होते, मात्र राहुल मालिकेतील चारही डावांमध्ये अपयशी ठरला. अशात श्रीलंकेविरुद्ध मायदेशात जानेवारी महिन्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेत राहुलला संघत जागा मिळेल की नाही? अशी शंका उपस्थित केली जात आहे. कुलदीप यादव मालिकेती पहिल्या कसोटीत सामनावीर ठरला होता, तरीदेखील दुसऱ्या कसोटीत त्याला बाहेर बसवले गेले. अशात राहुलला देखील संघातून बाहेर बसवण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.

2. फिरकी गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाज अपयशी –
भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांसमोर नेहमी चांगले प्रदर्शन करतात, असे बोलले जाते. मात्र बांगालदेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत चित्र वेगळेच पाहायला मिळाले. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी आनुकूल असून भारतीय फलंदाज स्वस्तात विकेट्स गमावताना दिसले. भारतीय फलंदाजांनी खासकरून फिरकी विरोधात विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले.

3. फिरकी गोलंदाजांऐवजी वेगवान गोलंदाजांना प्रधान्य का?
राहुल द्रविड सध्या भारताचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि त्यांनी या संघासाठी मोठ्या काळापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. असे असून देखील त्यांनी फिरकी गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर तीन वेगवान गोलंदाजांना संधी दिली. कर्णधार राहुल आणि द्रविडने चांगल्या फॉर्ममधील कुलदीपला संघातून वगळले आणि जयदेव उनाडकड याला संघात संधी दिली. अशात संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

4. विराट कोहलीचा फॉर्म –
आगामी वर्षात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. भारताला जर विश्वचषक जिंकायचा असेल, तर विराट कोहलीचा फॉर्म यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. तसेच संघाला येत्या काळात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळायची आहे. या मालिकेत देखील विराटच्या चांगल्या फॉर्मच्या जोरावर संघ विजय मिळवू शकतो. बांगालदेशविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये विराटची बॅट थंड होती. मात्र येत्या मालिकांमध्ये परिस्थिती बदलणे गरजेचे असेल.

5. बुमराह, जडेजा आणि शमी यांचे संघात पुनरागमन –
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा यांचे पुनरागमन होईल अशी पूर्ण शक्यता आहे. अशात या तिघांना प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही कारण न देता संधी दिली गेली पाहिजे. शमी मागच्या वर्षभरात अनेकदा प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर राहिला आहे. मात्र, त्याचे प्रदर्शन पाहता त्याला खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी देखील चाहत्यांकडून होत आली आहे. हे तिन्ही खेळाडूंनी येत्या काळात तंदुरुस्त होतून पुनरागमन केले, तर नक्कीच संघासाठी ही आनंदाची बाब असेल. (These five things are bothering Indian team despite giving a clean sweep to Bangladesh?)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुलला तोडावी लागली धोनीची परंपरा, मालिका विजयानंतर ‘या’ खेळाडूच्या हातात सोपवली ट्रॉफी  
नॉर्मल वाटलो का! अश्विनने 2022मध्ये कसोटीत चोपल्या विराट अन् श्रेयसपेक्षा जास्त धावा, आकडा वाचाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---