---Advertisement---

सुवर्णसंधी! आर अश्विनला ३ मोठी विक्रम मोडण्याची, तर कोहलीकडे पाँटिंगशी बरोबरी करण्याची संधी

On: शुक्रवार, डिसेंबर 3, 2021 1:01 PM
---Advertisement---

न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता. हा सामना अनिर्णीत राहिला होता, तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. मालिकेच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण या सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिकेवर आपले नाव कोरणार आहे.

तसेच हा सामना विराट कोहली आणि आर अश्विनसाठी देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. कारण या दोन्ही दिग्गज खेळाडूंना या सामन्यात मोठा विक्रम तोडण्याची सुवर्णसंधी आहे.

आर अश्विन तोडू शकतो हा मोठा विक्रम 
आर अश्विनने या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ८ गडी बाद केले होते. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये वसीम अक्रम यांचा ४१४ आणि हरभजन सिंगचा ४१७ गडी बाद करण्याचा विक्रम मोडून काढला होता. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला ३ गडी बाद करण्यात यश आले, तर तो सर्वाधिक कसोटी गडी बाद करणारा १२ वा गोलंदाज ठरेल. याबाबतीत तो दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज शॉन पोलॉकला मागे टाकू शकतो. शॉन पोलॉकने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण ४२१ गडी बाद केले होते.

तसेच जर त्याला मुंबई कसोटीत ८ गडी बाद करण्यात यश आले, तर त्याच्या नावे २ मोठ्या विक्रमांची नोंद होणार आहे. जर त्याने ८ गडी बाद केले, तर तो भारत – न्यूझीलंड कसोटी सामन्यांत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरू शकतो. त्याने आतापर्यंत न्यूझीलंड विरुद्ध ५८ गडी बाद केले आहेत.

भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यांत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम रिचर्ड हेडली यांच्या नावे आहे, ज्यांनी ६५ गडी बाद केले होते.

तसेच ८ गडी बाद करताच अश्विन वानखेडेच्या मैदानावर सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरू शकतो. आर अश्विनने या मैदानावर ३० गडी बाद केले आहेत, तर या यादीत सर्वोच्च स्थानी अनिल कुंबळे आहे, ज्यांच्या नावे ३८ गडी बाद करण्याची नोंद आहे.

विराट कोहली तोडू शकतो हा मोठा विक्रम 
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण ७० शतके झळकावली आहेत. विराट कोहलीने जर मुंबई कसोटीत शतक झळकावले, तर तो तिन्ही स्वरूपात सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रिकी पाँटिंगची बरोबरी करू शकतो. रिकी पाँटिंगने आपल्या कारकीर्दीत ७१ शतक झळकावले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

“केकेआर माझं दुसरं घर”, रिटेन केल्यानंतर सुनील नरेन झाला इमोशनल

व्वा, काय योग आलाय! भारतीय वंशाचा किवी गोलंदाज जन्मस्थळी खेळणार कसोटी, यापूर्वी ‘या’ खेळाडूबाबत घडलंय असं

न्यूझीलंडच्या जेमिसनचा धोका टाळण्यासाठी माजी भारतीय फलंदाजाचा ‘विराटसेने’ला मजेशीर पण कामाचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---