टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आता अवघे काही महिनेच शिल्लक राहिले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) स्पर्धेचे गट आणि वेळापत्रक देखील जाहीर केले होते. ज्यामध्ये भारताला आपला पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध २४ ऑक्टोबरला खेळायचा आहे. मात्र, अजूनही भारतीय संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केलेला नाही.
अशात भारतीय संघातील काही महत्त्वाचे खेळाडू देखील गेल्या काही काळापासून संघातून बाहेर आहेत. यातील असेही काही खेळाडू आहेत. जे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात पुनरागमन करू शकतात. आज आपण अशाच ३ खेळाडू बद्दल जाणून घेणार आहोत.
हार्दिक पंड्या
गेल्या काही काळापासून हार्दिक खराब फॉर्मशी झगडत आहे. मात्र हार्दिककडे असलेले कौशल्य सर्वांच्या परिचयाचे आहे. हार्दिकने अनेक वेळा भारतीय संघाला अडचणीच्या वेळेस मोलाचे योगदान देऊन भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यामुळे हार्दिकचे भारतीय संघात एक विशेष महत्त्व आहे.
हार्दिकने आतापर्यंत एकूण ५० टी-२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये त्याने तब्बल १४५.३५ च्या स्ट्राईक रेटने दमदार खेळी केली आहे. हार्दिकची अशी खेळी भारतीय संघासाठी खूप उपयुक्त आहे. तसेच हार्दिकच्या या आकडेवारीनुसार हार्दिकला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.
भुवनेश्वर कुमार –
गेल्या अनेक काळापासून भुवनेश्वर कुमारला भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. असे असले तरी, भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील एक अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्या कौशल्याचे प्रदर्शन त्याने अनेक वेळा घडवून आणले आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात भुवनेश्वर कुमारने भारतीय संघात पुनरागमन केले होते. यामध्ये त्याने आपले चांगले प्रदर्शन केले होते.
भुवनेश्वरने भारताकडून आतापर्यंत ५१ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ६.९ इकॉनॉमी रेटसह तब्बल ५० विकेट घेतले आहेत. ज्यामध्ये २४ धावा देऊन ५ विकेट्स ही भुवनेश्वरची सर्वोत्कृष्ट खेळी आहे. अशात गोलंदाजीमधील भुवनेश्वर कुमारचा अनुभव पाहता, भुवनेश्वरला येणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
श्रेयस अय्यर –
श्रेयस अय्यर हा भारतीय संघातील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र यंदाचे वर्ष श्रेयससाठी काही खास गेले नाही. दुखापतीमुळे प्रथम त्याला इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर व्हावे लागले. त्यानंतर आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यातून देखील त्याला बाहेर जावे लागले होते. त्यानंतर अनेक दिवस श्रेयस क्रिकेटपासून दूर राहिला होता.
असे असले तरी, श्रेयसला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात संधी मिळण्याची प्रबळ शक्यता वर्तवली आहे. श्रेयसने भारतीय संघाकडून खेळताना अनेकवेळा उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. ज्यामुळे त्याने भारतीय संघ व्यवस्थापकांचे लक्ष वेधले होते. श्रेयसने भारताकडून आतापर्यंत २८ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने ५५० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याचा १३३.८२ असा स्ट्राइक रेट आहे.
तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रेयसच्या नावे ३ अर्धशतक देखील आहेत. त्यामुळे भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी श्रेयस हा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
–विराट मैदानात उतरला म्हणजे विक्रम ठरलेलाच! एकाच खेळीत दोन मोठे विक्रमांसह दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
–“शिकणे अशी प्रक्रिया, जी कधीच संपत नाही”, सचिनसह अनेक आजी-माजी दिग्गजांनी दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
–मस्ती टाइम! दुसऱ्या डावात पुजाराचा चांगला स्ट्राइक रेट पाहून रोहितने उडवली खिल्ली, पाहा व्हिडिओ