भारतीय संघ डिसेंबर महिन्यात एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन एकदिवसीय, तर दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली न्यूझीलंड दौऱ्यात संघासोबत नव्हते. पण बांगलादेश दौऱ्यात या दोघांचे संघात पुनरागमन होईल. भारताचा मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव मात्र संघाच्या या आगामी दौऱ्यात विश्रांतीवर असेल. संघासमोर असा फलंदाज शोधण्याचे आव्हान आहे, जो या दौऱ्यात सूर्यकुमारची कमी भरून काढू शकेल.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मागच्या काही महिन्यांमध्ये वादळी खेळी करताना दिसत आहे. टी-20 विश्वचषख 2022 आणि आता न्यूझीलंड दौरा त्याने चांगलाच गाजवला आहे. अशात संघाला बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याची नक्कीच कमी जाणवणार आहे. त्याच्या अनुपस्थित संघाला या दौऱ्यात असा फलंदाज हवा आहे, जो संघासाठी काहीतरी खास करून दाखवू शकेल. आपण या लेखात अशाच तीन खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, जे सूर्याची कमी भरून काढू शकतात.
1) श्रेयस अय्यर –
भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आगामी बांगलादेश दौऱ्यात सूर्यकुमारची जागा भरून काढू शकतो. सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत तो भारताला विजय मिळवून देण्याच्या जबाबदारी स्वतःच्या खांद्यांवर घेऊ शकतो. मागच्या काही काळात एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचे प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. त्याने एकापेक्षा एक खेळी केल्याचे आपण पाहिले आहे.
श्रेयसने भारतासाठी आतापर्यंत 34 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 49.2 च्या सरासरीने फलंदाजी केली आणि एकूण 1379 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधूून 13 अर्धशतक आणि 2 शतक निघाले आहेत. श्रेयसची बॅट एकदिवसीय फॉरमॅटमध्ये अक्षरशः आग ओकताना दिसत आहे. अशात तो बांगलादेशविरुद्ध सूर्यकुमारची जागा घेण्यासाठी सक्षम दिसत आहे. श्रेयस असताना भारतीय संघाला प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्याची कमी कमी जाणवणार नाही, अशी अपेक्षा आहे.
2) रजत पाटीदार –
मध्य प्रेदशचा 28 वर्षीय फलंदाज रजत पटीदार (Rajat Patidar) याच्यासाठी 2022 वर्ष खूपच खास राहिले आहे. एक वेळ अशी होती, जेव्हा चाहते तो आरसीबीकडून खेळत असताना प्रश्न उपस्थित करत होते. पण आज तेच चाहते त्याला भारतीय जर्सीमध्ये पाहण्यासाठी वाट पाहत आहेत. आयपीएल 2022 मध्ये त्याने आरसीबीसाठी लखनऊ संघाविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात शतक केले. या खेळीनंतर त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या कॉलिफायर सामन्यात त्याने एक जबरदस्त अर्धशतक केले. त्यानंतर मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यातही त्याने शतक केले. एवढेच नाही भारत अ संघासाठी खेळतानाही त्याने 2 शतके केली आहेत.
त्याने यावर्षी केलेल्या प्रदर्शनावर एकंदरीत नजर टाकली, तर ते अप्रतिम राहिले आहे. त्याने यावर्षा 13 डावांमध्ये 88.82 च्या सरासरीने 977 धावा केल्या आहेत. यादरम्यान 4 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश त्याच्या खेळीमध्ये आहे. अशात पाटीदारला जर मध्यक्रमात खेळण्याची संधी मिळाली, तर मध्यक्रमात संघासाठी सूर्यकुमारची जागा नक्कीच भरून काढू शकतो.
3) राहुल त्रिपाठी –
सनरायझर्स हैदराबादचा वरच्या फळीतील वादळी फलंदाज राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यालाही भारताचा बांगलादेश दौऱ्यासाठी एकदिवसीय संघात निवडले गेले आहे. आयपीएल 2022 मध्ये राहुल त्रिपाठीने जबरदस्त प्रदर्शन केले. या प्रदर्शनाच्या जोरावर त्याला भारताच्या टी-20 संघातही संधी मिळाली.
आयपीएल 2022 मध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 37.55 च्या सरासरीने 413 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 158.24 राहिला. यावर्षी त्याने तीन अर्धशतके देखील केली आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने चांगला खेळ दाखवला आहे. त्याला बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली, तर तोदेखली सूर्याची कमी भरून काढू शकतो.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन.
(These three players can make up for the loss of Suryakumar Yadav in the tour of Bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी: मुंबई-पुण्याचे पराभव; हरियाणा-गुजरातने मारली बाजी
भारत 41 वर्षांपूर्वीचा ‘हा’ नकोसा विक्रम पुन्हा करणार? गावसकरांपेक्षा धवनकडून जास्त अपेक्षा!