---Advertisement---

SRH vs LSG: ‘हा’ ठरला हैदराबादच्या विजयाचा टर्निंग पॉईंट!

On: मंगळवार, मे 20, 2025 9:53 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील लखनऊ सुपर जायंट्स संघाच आव्हान संपुष्टात आलं आहे. संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडला आहे. लखनऊच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने लखनऊचा 6 विकेट्सने शानदार पराभव केला आणि 206 धावांचे लक्ष्य 10 चेंडू शिल्लक ठेवत गाठलं. या पराभवासह लखनऊ संघाचं प्लेऑफचं स्वप्न सलग दुसऱ्या वर्षी भंगल आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने चांगली सुरुवात केली. अभिषेक शर्माने 20 चेंडूत 59 धावांची तुफानी खेळी केली आणि सुरुवातीलाच सामना हैदराबादच्या बाजूने वळवला. ईशान किशन आणि अभिषेक शर्माने चांगली भागीदारी रचत लखनऊच्या गोलंदाजांना घाम फोडला. ईशान किशनसह त्याने पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा केल्या. पण, दिग्वेश राठीने 8व्या षटकात अभिषेकला बाद करून लखनऊच्या आशा जिवंत ठेवल्या. पण तरीही सनरायझर्सच्या फलंदाजांनी दबाव कायम ठेवत आव्हान सहज पूर्ण केले.

ईशान किशनने 28 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. याचबरोबर हेनरिक क्लासेनने 47 धावा केल्या तसेच कामिंदू मेंडिस 32 धावा करत यांनी संघाला विजय मिळवून दिला. ज्यामुळे हैदराबादने हा सामना 6 विकेट्सने जिंकला.

हैदराबाद संघ प्लेऑफमधून कधीच बाहेर पडला आहे पण त्यांनी हा सामना जिंकत लखनऊच्या प्लेऑफच्या आशांवर देखील पाणी फिरवले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---