भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात आतापर्यंत बरीच निराशाजनक ठरली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या हातून पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडविरुद्ध आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला त्यांच्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागेल.
भारतीय संघाचा हा इंग्लंड दौरा खूप मोठा आहे. भारतीय संघ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये यजमान इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे आणि मालिकेचा पहिला सामना नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर ४ ऑगस्टपासून खेळला जाईल.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या अंतिम ११ खेळाडूंच्या निवडीवर बरीच टीका झाली आणि स्विंगसाठी अनुकुल परिस्थिती असतानाही दोन फिरकीपटू खेळण्याच्या निर्णयामुळे अनेक प्रश्नही उभे राहिले होते. अशा परिस्थितीत, इंग्लंडविरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला इंग्लंडची चांगली जाणीव आहे आणि जर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये इतिहास घडवायचा असेल आणि ही मालिका जिंकायची असेल, तर त्यांना योग्य प्लेइंग ११ निवडावे लागेल.
अशावेळी भारतीय संघव्यवस्थापन पहिल्या कसोटी सामन्यात २ दिग्गज खेळाडूंना अंतिम ११ जणांच्या संघातून बाहेर ठेवू शकतात. त्या २ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
२.रवींद्र जडेजा
गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही स्वरूपामध्ये योगदान देण्याची क्षमता असलेला जडेजा एक हुशार खेळाडू आहे, यात शंका नाही. मात्र, इंग्लंडमधील परिस्थिती पाहता तो भारतीय संघात बसत नाही. इंग्लंडमधील परिस्थिती जे अनेकदा वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे भारतीय संघ आर अश्विन या एकाच फिरकीपटूसह पहिल्या कसोटीत उतरु शकतो.
जडेजाला त्याच्या बहुआयामी क्षमतेमुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात संघात समाविष्ट करण्यात आले होते. कारण, तो गोलंदाजीचाही पर्याय देऊन तसेच ७ व्या क्रमांकावर आवश्यक धावा करून योगदान देऊ शकतो. मात्र, तो दोन्ही डावांमध्ये फ्लॉप ठरला आणि तो गोलंदाजीत काही विशेष करू शकला नाही.
अशा परिस्थितीत, भारतीय कर्णधार विराट कोहली नॉटिंगहॅममधील पहिल्या कसोटीत खेळणाऱ्या ११ मध्ये जडेजाच्या जागी शार्दुल ठाकूरला घेऊ शकतो. जो स्विंग गोलंदाज आहे. तसेच चांगली फलंदाजी करण्यास सक्षम आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आपले उत्कृष्ट प्रदर्शन केले.
३.जसप्रीत बुमराह
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ज्याने भारताच्या वेगवान गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण, तो दीर्घ काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे आणि याचे उदाहरण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पाहायला मिळाले. जेथे बुमराहने खूप संघर्ष केला. तो सामन्यात विकेट्ससाठी तळमळत राहिला आणि शेवटी एकही विकेट त्याला मिळाली नाही. तसेच, त्याची गोलंदाजी पूर्वीसारखी तीक्ष्ण आणि प्रभावी दिसत नव्हती.
जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे आणि त्याने अलिकडच्या वर्षांत परदेशात भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. अशा परिस्थितीत त्याचे खराब फॉर्ममधून जाणे भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनत आहे.
अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहली जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा संघात समावेश करू शकतो. त्याची कामगिरी अलीकडच्या काळात खूप चांगली झाली आहे. सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
‘पंतप्रधान मोदी कृपाकरून भारतीय संघाचे सामने पाहू नका’, चाहत्यांची सोशल मीडियावरून मागणी