---Advertisement---

९०च्या दशकात जन्मलेला पहिलाच ग्रॅंडस्लॅम विजेता टेनिसला मिळाला, अमेरिकन ओपन…

On: सोमवार, सप्टेंबर 14, 2020 5:31 PM
---Advertisement---

न्युयॉर्क। रविवारी अमेरिकन ओपन २०२० च्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना पार पडला. हा अंतिम सामना

डॉमनिक थीम आणि जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात पार पडला. या सामन्यात थीमने झ्वेरेवचा पराभव करत कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले.

४ तास आणि १ मिनिट चाललेल्या या सामन्यात थीमने २-६,४-६,६-४,६-३,७-६(६) अशा फरकाने विजय मिळवला आणि इतिहास रचला. विशेष म्हणजे या अंतिम सामन्यात थीमने पहिले २ सेट गमावले होते. तसेच ५ व्या सेटमध्येही तो ३-५ अशा फरकाने पिछाडीवर होता. परंतु नंतर झ्वेरेवच्या चुकांचा चांगला फायदा करुन घेत थीमने ५ व्या सेटच्या टायब्रेकमध्ये सामना जिंकला. हा अमेरिकन ओपनमधील पहिला असा अंतिम सामना होता, जो पाचव्या सेटमध्ये टायब्रेकमध्ये गेला.

२७ वर्षीय थीम हा ओपन इरामधील (१९६८नंतर) अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात पहिले २ सेट गमावल्यानंतर विजेतेपद जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तर ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात पहिले २ सेट गमावल्यानंतर विजेतेपद जिंकणारा एकूण पाचवा टेनिसपटू ठरला आहे. याआधी बियॉन बोर्ग (१९७४), इवान लेंडल(१९८४), आंद्रे आगासी(१९९९) आणि गॅस्टन गॉडिओ(२००४) या चौघांनीही फ्रेंच ओपनमध्ये पहिले २ सेट गमावल्यानंतरही अंतिम सामना जिंकण्याचा पराक्रम केला होता.

https://twitter.com/atptour/status/1305302150226964480

याबरोबर थीम हा १९९० नंतर जन्मलेला पहिला ग्रँड स्लॅम विजेता आहे. त्याच्या आधी १९९० नंतर जन्मलेल्या एकाही टेनिसपटूला ग्रँडस्लॅम जिंकता आले नव्हते. विशेष म्हणजे यावेळी हा पराक्रम करण्याची झ्वेरेवलाही संधी होती. कारण त्याचाही जन्म १९९७ चा आहे.

थीम हा ओपन इराचा ५५ वा ग्रँड स्लॅम विजेता आहे. तर एकूण १५० वा ग्रँडस्लॅम विजेता आहे. या अंतिम सामन्यात थीमने एकूण १६३ पाँइंट्स जिंकले तर झ्वेरेवने १५९ पाँइंट्स जिंकले. यावरुन लक्षात येऊ शकते की या दोघांमधील हा सामना किती रोमांचक झाला असेल.

कारकिर्दील पहिले ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर थीम म्हणाला, ‘आम्ही(मी आणि झ्वेरेव) २०१४ पासून एकमेकांना ओळखतो. आमच्यात तेव्हापासून चांगली मैत्री आहे आणि आम्ही चांगले प्रतिस्पर्धीही आहोत. हा क्षण अनुभवण्यासाठी आमचा दुरचा प्रवास झाला आहे. मला वाटते की आज दोन विजेते हवे होते. आम्ही दोघेही विजेतेपदासाठी पात्र होतो.’

तसेच थीमने विजेतेपदाबद्दल ट्विट केले आहे की ‘हे असेच व्हायला हवे होते. माझी कारकिर्द आजच्या सामन्यासारखीच राहिली आहे. अनेक चढ-उतार आले आहेत आणि त्याचा जसा निकाल लागला, तो चांगला होता.’

https://twitter.com/ThiemDomi/status/1305329376662355970

थीम हा ग्रँड स्लॅम जिंकणारा ऑस्ट्रियाचा केवळ दुसरा टेनिसपटू आहे. त्याच्याआधी थॉमस मस्टर यांनी १९९६ ला फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवले होते. तसेच थीमचा हा चौथा अंतिम सामना होता. याआधी त्याला दोन वेळा फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात नदालकडून तर यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात जोकोविचकडून पराभव स्विकारावा लागला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणाला, आयपीएल यापेक्षा चांगल्या वेळेत येऊ शकली नसती, कारण…

हा क्रिकेटपटू आपल्या मुलीला करतोय मिस; म्हणाला बऱ्याच दिवसांपासून झाली नाही भेट

गौतम गंभीरला म्हणतो, एबी डिविलियर्स प्रमाणेच हा खेळाडूही आहे ‘मिस्टर ३६०’

ट्रेंडिंग लेख –

सीपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे हे ५ खेळाडू आयपीएलमध्येही धमाका करण्यास सज्ज

एमएस धोनीशी तुलना केली जाणारा पठ्या गाजवणार आयपीएल; करतोय स्मिथच्या राजस्थानकडून एंट्री

यंदाचा आयपीएल हंगाम गाजवू शकतात हे ५ दिग्गज सलामीवीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---