---Advertisement---

अरे बापरे! ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या घरी चोरी, महागडी कार लंपास

On: मंगळवार, फेब्रुवारी 9, 2021 10:41 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांच्या मेलबर्नमधील राहत्या घरी चोरी झाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी (५ फेब्रुवारी) ही घटना घडली आहे. चोरट्यांनी गुपचूप घरात घुसून त्यांची महागडी कार लंपास केली आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध ‘चॅनल ७’ ने ही खळबळजनक माहिती दिली आहे.

आपली कार चोरीला गेली असल्याचे निदर्शनास येताच पाँटिंग यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध जवळच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपासानंतर अखेर पोलिसांना मेलबर्न येथील केम्बर्वेल भागात पाँटिंग यांची कार सापडली. सोबतच कार चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पकडण्यातही पोलिसांना यश आले. चोरीची घटना घडतेवेळी पाँटिंग आपली पत्नी आणि ३ मुलांसह घरी होते.

रिकी पाँटिंग यांची क्रिकेट कारकिर्द

पाँटिंग यांना ऑस्ट्रेलियातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाते. त्यांनी १९९५-२०१२ या कालावधीत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्त्व करताना ३७५ वनडे सामने खेळले होते. यादरम्यान त्यांनी ८०.३९ च्या सरासरीने १३७०४ धावा केल्या होत्या. तसेच १६८ कसोटी सामन्यात त्यांनी ५८.७२ च्या सरासरीने १३३७८ धावा केल्या होत्या. तसेच १७ टी२० सामन्यात २८.६४ च्या सरासरीने ४०१ धावा केल्या होत्या.

याबरोबरच त्यांनी आपल्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाला दोन वेळा विश्वविजेता बनवले आहे. २००३ आणि २००७ मध्ये त्यांच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषक जिंकला होता. याबरोबरच २००६ आणि २००९ मध्ये त्यांनी संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली होती.

पाँटिंग सध्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. याबरोबरच गतवर्षी त्यांनी आपल्या प्रशिक्षणाखाली इंडियन प्रीमियर लीगच्या दिल्ली कॅपिटल्स संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---