---Advertisement---

‘तिसऱ्या सामन्यात हॅट्रिक घेण्याच्या विचारात होतो’, मालिका जिंकल्यानंतर अर्शदीपची खास प्रतिक्रिया

On: बुधवार, नोव्हेंबर 23, 2022 1:28 PM
arshdeep singh mohammad siraj
---Advertisement---

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका 1-0 अशा फरकाने जिंकला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. पंचांना डकवर्थ लुईस नियामच्या आधारे सामना बोरबरीने सोडवला. मालिकेतील हा शेवटचा सामना मंगळवारी (22 नोव्हेंबर) नेपियरमध्ये खेळला गेला असून युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या. सामना संपल्यानंतर या दोघांनी बीसीसीआय टीव्हीसाठी मुलाखत दिली. 

यजमान न्यूझीलंड संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 160 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 9 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर 75 धावा केल्या होत्या. पण तितक्यात पावसाने मैदानात हजेरी लावली आणि पुढचा खेळ रद्द करावा लागला. काही वेळ वाट पाहिल्यानंतर पंचांना सामना बरोबरीवर सोडवण्याचा निर्णय घ्यावा लागला. मालिकेतील पहिला सामना देखील पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द केला गेला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र भारतान 65 धावांनी मोठा विजय मिळवला होता.

टी-20 मालिका नावावर केल्यानंतर बीसीसीआयने अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि मोहम्मद सिराज (Mohammad) यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ अर्शदीप सिंगने हॅट्रिकविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली. 19 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर अर्शदीपने न्यूझीलंडच्या डेरिल मिचेल आणि दुसऱ्या चेंडूवर जिमी नीशन यांना तंबूचा रस्ता दाखवला. अशात तिसऱ्या चेंडूवर त्याला हॅट्रिक घेण्याची संधी होती, पण असे होऊ शकले नाही. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर एडम मिल्ने धावबाद झाल्यामुळे ही विकेट अर्शदीपला मिळाली नाही. त्याने या सामन्यात टाकलेल्या चार षटकांमध्ये 37 धावा दिल्या आणि चार विकेट्स नावावर केल्या.

https://twitter.com/BCCI/status/1595273719928102912?s=20&t=K8xBDgRt-EvezhQynF8uGQ

व्हिडिओत मोहम्मद सिराज म्हणाला की, मागच्या मोठ्या काळापासून हार्ड लेंथ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. तेव्हा कुठे असे प्रदर्शन करणे शक्य झाले. या प्रदर्शनामुळे खुश आहे. माझा प्रयत्न फक्त धावांवर लगाम लावण्याचा होता. सिराजने या सामन्यात टाकलेल्या चार षटकांमध्ये 17 धावा देत चार विकेट्स घेतल्या. यासाठी त्याला सामनावीर देखील निवडले गेले. टी-20 मालिकेत भारताने विजय मिळवल्यानंतर उभय संघांतील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 25 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. शिखर धवन या मालिकेत भारताच्या कर्णधाराची भूमिका पार पाडेल. (‘Thinking of taking a hat-trick in the third match’, Arshdeep’s special reaction after winning the t20 series)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिकची कॅप्टन्सी भारीच! म्हणाला,’ पूर्णवेळ नेतृत्व मिळाले तर मी माझ्या मना….’
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने ‘या’ दिग्गजालाही केले क्लीन बोल्ड, हिसकावून घेतला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---