मँचेस्टर। इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या चौथ्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 8 बाद 497 धावांवर घोषित केला. त्यांच्याकडून स्टिव्ह स्मिथने द्विशतकी खेळी केली.
स्मिथने या सामन्यात 319 चेंडूत 211 धावा केल्या. या खेळीत त्याने 24 चौकार आणि 2 षटकार मारले. स्मिथचे हे कसोटी कारकिर्दीतील तसेच ऍशेसमधीलही तिसरे द्विशतक आहे.
त्यामुळे तो ऍशेस कसोटी मालिकेमध्ये सर्वाधिक द्विशतके करण्याच्या यादीत डॉन ब्रॅडमन आणि वॅली हॅमंड यांच्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. ब्रॅडमन यांनी ऍशेसमध्ये 8 वेळा एका डावात 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर हॅमंड यांनी 4 वेळा असा कारनामा केला आहे.
स्मिथने त्याची ही द्विशतके 2015, 2017 आणि 2019 अशा सलग तीन ऍशेस मालिकेत प्रत्येकी एक अशी केली आहेत. त्यामुळे तो सलग तीन ऍशेस मालिकेत द्विशतक करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
ऍशेसमध्ये त्याने जूलै 2015 ला लॉर्ड्सवर 215 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने 2017 च्या ऍशेसमध्ये पर्थमध्ये 239 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने सध्या चालू असलेल्या ऍशेस मालिकेत चौथ्या कसोटीत द्विशतकी खेळी केली आहे.
सध्या सुरु असलेल्या 2019 ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत स्मिथने 211 धावा करताना तिसऱ्या विकेटसाठी मार्नस लॅब्यूशानेबरोबर 116 धावांची तर कर्णधार टिम पेनबरोबर सहाव्या विकेटसाठी 145 धावांची भागीदारी केली. या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने पहिल्या डावात 1 बाद 23 धावा केल्या असून अजून ते 474 धावांनी पिछाडीवर आहेत.
ऍशेसमध्ये सर्वाधिक वेळा एका डावात 200 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
8 – डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)
4 – वॅली हॅमंड (इंग्लंड)
3 – स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
2 – बॉब सिम्पसन (ऑस्ट्रेलिया)
2 – ऍलिस्टर कूक (इंग्लंड)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–तब्बल १२५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकडून टिम पेनने केला असा मोठा कारनामा
–स्टिव्ह स्मिथने मास्टर ब्लास्टर तेंडूलकरपेक्षा १५ डाव कमी खेळताना केला मोठा पराक्रम
–‘या’ सामन्यानंतर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटटर मोहम्मद नबी होणार कसोटीतून निवृत्त