नांदेड चांबल चॅलेंजर्स विरुद्ध नाशिक द्वारका डिफेंडर्स यांच्यात आजची शेवटची लढत झाली. नांदेड संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी होता तर नाशिक संघ आठव्या स्थानी होता. नांदेड संघाने आक्रमक खेळ करत काही मिनिटांतच नाशिक संघाला ऑल आऊट करत आघाडी मिळवली. अजित चव्हाण च्या आक्रमक चढाया आणि अभिषेक बोरुडे च्या जबरदस्त पकडीच्या खेळीने नाशिक संघ सामन्याच्या दहाव्या मिनिटाला दुसऱ्यांदा ऑल आऊट झाला.
मध्यंतराला नांदेड संघाकडे 35-10 अशी भक्कम आघाडी होती. मध्यांतरापूर्वीच अजित चव्हाण ने सुपर टेन तर अभिषेक बोरुडे ने हाय फाय पूर्ण केला होता. नांदेड संघाने मध्यंतरानंतर ही आक्रमक खेळ सुरू ठेवत आपली आघाडी भक्कम केली. नाशिक संघाने नांदेड संघावर एक लोन पाडत प्रतिकार देण्याचा प्रयत्न केला मात्र नांदेड संघाच्या अजित चव्हाण ने आक्रमक चढाया करत संघाची आघाडी कायम ठेवली.
नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाने 64-29 असा मोठा विजय मिळवत चौथा स्थान कायम ठेवला. या विजयाने नांदेड संघ टॉप 2 च्या शर्यतीत कायम राहिला आहे. नांदेड संघाकडून अजित चव्हाण ने चढाईत 26 गुण मिळवले तर अभिषेक बोरुडे ने एकाच सामन्यात सर्वाधिक पकडीत 11 गुण मिळवण्याचा विक्रम केला. नाशिक कडून पवन भोर ने 7 गुण मिळवले. (Third win for Nanded Chambal Challengers in the promotion round)
बेस्ट रेडर- अजित चव्हाण, नांदेड चांबल चॅलेंजर्स
बेस्ट डिफेंडर- अभिषेक बोरुडे, नांदेड चांबल चॅलेंजर्स
कबड्डी का कमाल- अक्षय सूर्यवंशी, नांदेड चांबल चॅलेंजर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाची ठाणे संघावर मात
SRHvDC| नाणेफेक जिंकत दिल्लीची प्रथम फलंदाजी, वॉर्नर 4 वर्षानंतर खेळणार हैदराबादमध्ये