ऑस्ट्रेलियाविरुद्ध रायपूर येथे पार पडलेला चौथा टी20 सामना भारतीय संघाने 20 धावांनी खिशात घातला. या विजयात अनेक खेळाडूंचे मोलाचे योगदान राहिले. त्यात 30 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा याचाही समावेश होता. जितेशने शुक्रवारी (दि. 1 डिसेंबर) चौथ्या कसोटीत वादळी फलंदाजी करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. याविषयी माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, जितेशने आज ज्याप्रकारे फलंदाजी केली, ते अविश्वसनीय होते.
जितेश शर्मा (Jitesh Sharma) याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध 19 चेंडूत 35 धावा केल्या आहेत. त्याच्या खेळीत 1 चौकार आणि 3 षटकारांचाही समावेश होता. रिंकू सिंग याच्यासोबत त्याने शानदार भागीदारी केली होती. त्यामुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियापुढे निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 175 धावांचे आव्हान उभे केले.
काय म्हणाला अभिषेक नायर?
जिओ सिनेमावर बोलताना, जितेश शर्मा याच्याविषयी अभिषेक नायर (Abhishek Nayar) याने मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “जितेश शर्माने आज खूपच जबरदस्त खेळ केला. सामन्यापूर्वी मी बोलत होतो की, तो कशाप्रकारे निर्भीडपणे खेळतो आणि आज त्याने तशाच प्रकारे फलंदाजी केली.”
खरं तर, जितेशनेही आपल्या वादळी खेळीविषयी वक्तव्य केले होते. तो म्हणालेला, “व्हीव्हीएस लक्ष्मण मला म्हणाले की, मी माझा नैसर्गिक खेळ खेळावा. त्यांनी मला तसेच खेळण्यास सांगितले, जसे मी खेळत आलो आहे. त्यांनी प्रशिक्षणावेळी नेहमी मला पाठिंबा दिला. त्यांचे लक्ष्य यावर असते की, जर तुमची तयारी चांगली आहे, तर निकालही खूप चांगले येईल. मी रिंकूशी चर्चा केली आणि म्हटलो की, जर ऑफ स्पिनर आला, तर मी त्याच्याविरुद्ध पूर्णपणे आक्रमक शॉट खेळण्याचा प्रयत्न करेल.”
सामन्याचा आढावा
खरं तर, रायपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या नाकी नऊ आल्या. ऑस्ट्रेलिया संघाला 20 षटकात 7 विकेट्स गमावत 154 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना भारतीय संघाने 20 धावांनी जिंकला.
आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील अखेरचा म्हणजेच पाचवा टी20 सामना रविवारी (दि. 3 नोव्हेंबर) बंगळुरूत खेळला जाणार आहे. (this former cricketer praise young wicket keeper jitesh sharma fearless batting vs australia)
हेही वाचा-
उपकर्णधार असलेला रहाणे आता टीमच्या बाहेर कसा? दिग्गज क्रिकेटपटूचा बोर्डाला सवाल
‘…तर मी कसोटी खेळू शकणार नाही’, Team Indiaच्या स्टार खेळाडूचे धक्कादायक विधान