---Advertisement---

भारतीय संघातून बाहेर असलेला ‘हा’ खेळाडू निघाला परदेशात, करणार ‘या’ संघाचे प्रतिनिधित्व

Team-India
---Advertisement---

अलीकडच्या काळात भारतीय खेळाडू मोठ्या संख्येने काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याने नॉर्थम्प्टनशायर संघासोबत करार केला आहे. तसेच, गुजरात टायटन्स संघाचा सलामी फलंदाज साई सुदर्शन हादेखील काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये 3 सामन्यांमध्ये सरे संघाकडून खेळताना दिसणार आहे. अशात या खेळाडूंनंतर आता भारतीय संघातून बाहेर असणारा जयंत यादव काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.

काऊंटी चॅम्पियनशिप (County Championship) स्पर्धेत जयंत यादव मिडलसेक्स (Jayant Yadav Middlesex) संघाकडून 4 सामने खेळणार आहे. 33 वर्षीय जयंत यादव (Jayant Yadav) याने भारतीय संघाकडून आतापर्यंत फक्त 6 कसोटी आणि 2 वनडे सामने खेळले आहेत.

जयंत यादव याने मागील वर्षी भारतीय संघाकडून मार्च महिन्यात मोहाली कसोटी सामन्यात भाग घेतला होता. यादरम्यान त्याने एकही विकेट घेतली नव्हती, तर फलंदाजी करताना फक्त 2 धावा केल्या होत्या. तसेच, वनडेत त्याने फक्त 1 विकेट घेतली आहे. जयंतने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार शतकी खेळीही साकारली आहे, जी इंग्लंडविरुद्ध 2016मध्ये खेळली होती. इंग्लंडमध्ये आयोजित काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये जयंत यादव मागील वर्षी वॉर्विकशायर संघाकडून दोन सामने खेळला होता. मात्र, यावर्षी तो एका नवीन संघासोबत जोडला जाणार आहे.

https://twitter.com/Middlesex_CCC/status/1697549874508546515?s=20

काय म्हणाला जयंत?
जयंत यादव आपला पहिला सामना एसेक्स संघाविरुद्ध खेळणार आहे. यानंतर तो लंकाशायर, वॉर्विकशायर आणि नॉटिंघमशायर संघांविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरेल.

मिडलसेक्स काऊंटी संघासोबत जोडल्या गेल्यानंतर जयंत म्हणाला, “मी आगामी चॅम्पियनशिप सामन्यांसाठी प्रतिष्ठित मिडलसेक्स काऊंटी क्रिकेट क्लबमध्ये सामील होणे आणि या क्लबच्या समृद्ध क्रिकेट इतिहासाचा भाग बनल्याबद्दल सन्मानित तसेच उत्साहित आहे. मला मागील वर्षी काऊंटी क्रिकेटमध्ये खेळून खूपच चांगले वाटले होते.”

जयंतची देशांतर्गत क्रिकेटमधील कारकीर्द
वेगवान गोलंदाज जयंतच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 75 प्रथम श्रेणी सामने खेळताना 205 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 2019-20च्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने हरियाणाकडून खेळताना 58 धावा खर्चून घेतलेल्या 7 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. (this india offspinner joined middlesex short term deal last four county championship matches know here)

हेही वाचाच-
‘हा’ भारतीय ठेचणार बाबरच्या नांग्या, IND vs PAK सामन्यापूर्वी दिग्गजाची भविष्यवाणी
‘पाकिस्तानी तिकडीविरुद्ध सावधगिरी बाळगावी लागेल’, महामुकाबल्यापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भारताला चेतावणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---