सध्या अनेक भारतीय खेळाडू इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेट काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेताना दिसत आहेत. मागील काही काळापासून चेतेश्वर पुजारा यांसारख्या खेळाडूंनी काऊंटीच्या जोरावर राष्ट्रीय संघात पुनरागमनही केले आहे. त्यानंतर उमेश यादव, नवदीप सैनी, पृथ्वी शॉ यांसारखे खेळाडूही इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटकडे वळले. अलीकडेच, आशिया चषक आणि विश्वचषक संघात सामील न झालेला खेळाडू युझवेंद्र चहल हादेखील केंट या काऊंटी संघासोबत जोडला गेला होता. अशातच आता आणखी एक भारतीय खेळाडू काऊंटी संघाकडून खेळताना दिसणार आहे.
कोण आहे तो खेळाडू?
भारतीय संघाकडून फक्त 6 कसोटी सामने खेळणारा आणि त्रिशतक ठोकणारा फलंदाज करुण नायर काऊंटी चॅम्पियनशिप (Karun Nair County Championship) स्पर्धेकडे वळला आहे. करुण नायर (Karun Nair) या स्पर्धेतील शिल्लक 3 सामने खेळण्यासाठी तयार आहे. करुण नायर नॉर्थम्प्टनशायर (Karun Nair Northamptonshire) संघासोबत जोडला गेला आहे. 31 वर्षीय क्रिकेटपटू नॉर्थम्प्टनशायर संघात सॅम व्हाईटमॅन याची जागा घेणार आहे. सॅम ऑस्ट्रेलियाला परतल्यामुळे करुणला ही संधी मिळाली आहे.
काय म्हणाला करुण?
करुण नायर याने नॉर्थम्प्टनशायर संघाशी जोडल्याविषयी एक निवेदन जारी केले. त्यात त्याने म्हटले, “मी नॉर्थम्प्टनशायर संघाशी जोडल्याने आणि काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी उत्साहित आहे. तुम्ही काऊंटी क्रिकेटबाबत खूप ऐकता आणि मला माहिती आहे की, पृथ्वी शॉ जेव्हा संघासोबत होता, त्याने खूपच आनंद घेतला होता. त्यामुळे काऊंटी खेळण्याची संधी मिळाल्यामुळे उत्साहित आहेत. आशा करतो की, मी संघासाठी योगदान देऊ शकेल.”
काऊंटी संघाशी जोडण्यासाठी नायर शुक्रवारी (दि. 08 सप्टेंबर) ब्रिटनला पोहोचला. तो रविवारी (दि. 10 सप्टेंबर) वॉर्विकशायरविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसू शकतो.
भारतासाठी त्रिशतक ठोकणारा दुसरा खेळाडू
करुण नायरविषयी बोलायचं झालं, तर तो वीरेंद्र सेहवाग याच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी त्रिशतक ठोकणारा दुसरा खेळाडू आहे. त्याने ही कामगिरी इंग्लंडविरुद्ध डिसेंबर 2016मध्ये चेन्नई येथे केली होती. त्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत करुणने नाबाद 303 धावा चोपल्या होत्या. त्याच्या नावावर 6 कसोटी सामन्यातील 7 डावात 374 धावांची नोंद आहे. 2016मध्ये झिम्बाब्वे संघाविरुद्ध वनडे पदार्पण करणाऱ्या करुणने भारतासाठी फक्त दोन वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 39 ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. (this indian cricketer joins county team northamptonshire has test triple century registered on his name 2023)
हेही वाचाच-
लखनऊची ताकद वाढली! ‘या’ 9 स्टाफच्या जोरावर पटकावणार IPL 2024चं विजेतेपद, नावं पाहून हादरून जाल
शाहरुखच्या ‘Jawan’बद्दल रिंकू म्हणाला ‘डिस्टर्ब करू नका…’, तर कार्तिकने केला प्रामाणिक रिव्ह्यू; वाचाच





