---Advertisement---

IND vs ENG: बर्मिंघममध्ये ‘या’ भारतीय खेळाडूचा दबदबा, कॅप्टन गिलचा सर्वात मोठा शस्त्र ठरणार!

On: गुरूवार, जून 26, 2025 10:34 PM
---Advertisement---

भारतीय संघ लीड्समध्ये झालेल्या पराभवानंतर पुनरागमाची तयारी करत आहे. पुढचा सामना भारतीय संघाला बर्मिंघममध्ये खेळायचा आहे, जिथे टीम इंडियाचे रेकॉर्ड खूप लाजिरवाणे राहिलेले आहे. अशा परिस्थितीत कर्णधार गिल (Shubman gill) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam gambhir) यांच्यावर दबाव असणार आहे. पण एक खेळाडू असा आहे ज्याचं या मैदानावर शानदार रेकॉर्ड राहिलेलं आहे. या खेळाडूने इंग्लंड संघाविरुद्ध या मैदानावर या आधीही धावांचा पाऊस पडलेला आहे, ज्या कारणाने तो दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार गिलचा सर्वात विश्वासातील खेळाडू ठरू शकतो.

इंग्लंडच्या बर्मिंघम एजबेस्टन क्रिकेट ग्राउंड वर भारतीय संघ पुढचा सामना खेळणार आहे. जिथे यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतंच रेकॉर्ड चांगलं राहिलेलं आहे, पंतने त्या मैदानावर 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता, जिथे त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केलेल्या पहिल्या डावात 111 चेंडूत 146 धावांची अत्यंत शानदार पारी खेळली होती. याशिवाय दुसऱ्या डावात सुद्धा त्याने 86 चेंडूत 57 धावा केल्या होत्या. जर पंत दुसऱ्या कसोटी सामनात याच अंदाजात खेळला तर टीम इंडिया (Team india) सहज मोठी धावसंख्या करू शकते. या मैदानावर जर टीम इंडियाने चांगली धावसंख्या केली तर इंग्लंड संघ दबावात येऊ शकतो.

इंग्लंड संघाविरुद्ध रिषभ पंत नेहमीच चांगली खेळी करतो. त्याने आतापर्यंत इंग्लंडच्या मैदानावर 4 शतके झळकावली आहेत. ज्यामध्ये 2 शतके मागच्या सामन्यात लीड्समध्ये त्याने केली होती. पंतने पहिल्या डावात 134 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात 118 धावा केल्या. त्यानंतरही खराब गोलंदाजी आणि फिल्डिंगमुळे टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. रिषभला चांगली विकेट कीपिंग देखील करावी लागेल, तरच भारतीय संघ इंग्लंडचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव करू शकेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---