भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली नेहमी 18 क्रमांकाची जर्सी घालून खेळताना दिसको. चाहत्यांमध्ये या गोष्टीविषयी खूप उत्सुकता आहे की, विराट नेहमी याच क्रमांकाची जर्सी का घालतो. रविवारी (दि. 5 नोव्हेंबर) विराट त्याचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त तो 18 क्रमांकाची जर्सी का घालतो, यामागचे कारण जाणून घेऊ.
विराटचा जन्म 5 नोव्हेंबर, 1988 साली दिल्लीमध्ये झाला होता. विराटने त्याचे शिक्षण दिल्लीच्याच विशाल भारती पब्लिक स्कूलमधून घतले आहे. विराटने त्याचे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढे शिक्षणाला रामराम केला. यानंतर विराटने त्याचे पूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले, यावरून त्याचे क्रिकेटविषयीचे प्रेम समजते. त्याने 18 ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी त्याचा पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर विराट आज भारतीय संघाचा कर्णधार असून त्याने कारकिर्दीत स्वत:च्या नावावर अनेक विक्रमांची नोंद केली आहे.
विराट मैदानात खेळताना नेहमी 18 क्रमांकाची जर्सी घालतो, यामागे एक विशेष कारण आहे. चाहत्यांनाही विराटच्या या 18 क्रमांकाच्या जर्सीविषयी अनेक प्रश्न पडतात. विराटचे वडील त्याला भारतीय संघासाठी खेळताना पाहू शकले नाहीत. त्याचे वडील 18 नोव्हेंबर 2016 मध्ये हे जग सोडून गेले, ज्याचे दु:ख विराट आजही विसरू शकलेला नाही. त्याच्या वडिलांचे निधन 18 तारखेला झाला असून विराटला या क्रमांकासोबत एक खास नाते आहे. विराट त्याच्या वडिलांच्या आठवणीत ही 18 क्रमांकाची जर्सी घालतो.
विराट कोहली सध्या त्याच्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाला वनडे विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विराटची भूमिका महत्वाची राहील. त्याने यादरम्यान 7 सामन्यात 88.40च्या सरासरीने 442 धावा केल्या आहेत. तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. नाबाद 103 ही त्याची यादरम्यानची सर्वोच्च खेळी आहे. अशात विराट पुढील सामन्यांमध्येही शानदार प्रदर्शन करेल, अशी संघाला आणि चाहत्यांनाही आशा आहे.
हेही वाचा-
‘या’ कारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नव्हता विराट, वाचून काळजात होईल धस्स!
कोहलीचा विषयच खोल! महिन्याला पितो तब्बल ‘एवढ्या’ रुपयांचं पाणी, आकडा सामन्यांच्या पगारापेक्षा जास्त