---Advertisement---

अरे यार! तब्बल 9 वर्षापासून रोहित करत आलेल्या लाजवाब कामगिरीत पडला खंड

On: मंगळवार, डिसेंबर 20, 2022 10:02 PM
Rohit Shamra smashing six
---Advertisement---

भारताचा पुरूष क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहेत. मालिकेतील पहिला सामना जिंकत भारताने आघाडी घेतली असली, तरी दुसरी कसोटी सुरू होण्याआधीच संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसऱ्या सामन्यातून रोहित शर्मा अधिकृतपणे बाहेर पडला असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबतची घोषणा केली. मात्र, याचबरोबर रोहित नऊ वर्षापासून करत असलेल्या एका शानदार कामगिरीत खंड पडणार आहे.

रोहित बांगलादेश दौऱ्यावरील वनडे मालिकेत सहभागी झाला होता. दुसऱ्या सामन्यावेळी त्याला दुखापत झाल्याने त्याने तिसऱ्या सामन्यातून माघार घेतलेली.‌ तसेच कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यालाही तो मुकला. भारतीय संघाने या सामन्यात विजय संपादन केला. रोहितच्या अंगठ्याला झालेली ही दुखापत अद्यापही बरी न झाल्याने त्याने दुसऱ्या कसोटीतूनही माघार घेण्याचा निर्णय घेतला.

भारतीय संघाचा 2022 या वर्षातील हा अखेरचा सामना ठरणार आहे.‌ त्यामुळे मागील 9  वर्षापासून रोहित करत आलेली एक कामगिरी त्याच्याकडून यावर्षी होणार नाही. रोहितने 2013 पासून 2021 पर्यंत एका कॅलेंडर वर्षात कमीत कमी एक शतक झळकावले आहे. मात्र, 2022 वर्षात त्याला ही कामगिरी करता आली नाही.

रोहितने यावर्षी केवळ दोन कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. तर, 8 वनडे खेळताना 249 धावा बनवल्या. यासोबतच 29 टी20 सामन्यांमध्ये त्याला शतक झळकावता आले नाही. नवीन वर्षात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. भारतीय संघाला यावर्षी मायदेशात वनडे विश्वचषक खेळायचा आहे.

(This Is First Time When Rohit Sharma Not Hot 100 In Calender Year Since 2013)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची नाचक्की! ब्रिस्बेन कसोटी जिंकूनही व्हावे लागले अपमानित; वाचा संपूर्ण प्रकरण
बॉक्सिंग डे कसोटीत वॉर्नला वाहिली जाणार खास श्रद्धांजली; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केले नियोजन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---