मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भा्रत संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 137 धावांनी पराभूत करत 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने 86 धावांत 9 विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाचा हा कसोटी क्रिकेटमधील 150 वा विजयी सामना ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 150 सामने जिंकण्याचा पराक्रम करणारा भारत केवळ पाचवा संघ ठरला आहे. याआधी असा पराक्रम ऑस्ट्रेलिया(384), इंग्लंड(364), विंडीज(171) आणि दक्षिण आफ्रिका(162) संघाने केला आहे.
विशेष म्हणजे भारताने 150 कसोटी विजयांपैकी 28 विजय हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिळवले आहेत. त्यामुळे भारताने सर्वाधिक कसोटी विजय ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिळवण्याचा विक्रम रचला आहे.
भारताने कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 532 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 150 सामन्यात विजय, 165 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तर 216 सामने अनिर्णित राहिले आहेत आणि 1 सामना बरोबरीत सुटला आहे.
भारताने कसोटीतील 50 वा विजय 1994 मध्ये मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली मिळवला होता. हा सामना लखनऊमध्ये श्रीलंका विरुद्ध पार पडला होता. या सामन्यात अनिल कुंबळेला सामनावीर पुरस्कार मिळला होता.
त्यानंतर भारताने 100 वा कसोटी विजय 2009 मध्ये एमएस धोनीेच्या नेतृत्वाखाली मिळवला होता. हा सामनाही श्रीलंकेविरुद्ध कानपूर येथे पडला होता. या सामन्यात एस श्रीसंतला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडियाची कसोटी मालिकेत सरशी, ऑस्ट्रेलियाला १३७ धावांनी पराभवाचा धक्का
–मेलबर्न कसोटीत पाचव्या दिवशी नक्की पाऊस हजेरी लावणार? वाचा येथे
–शेपूट वळवळलं! टीम इंडियाच सेलीब्रेशन १६ तासांनी लांबलं