पर्थ। आज(18 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाने ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध 146 धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
2018 या वर्षातील भारतीय संघाचा कसोटीमधील हा सातवा पराभव आहे. त्यामुळे एका वर्षात भारताने कसोटी क्रिकेटमध्ये 7 सामन्यात पराभव स्विकारण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी 1959 आणि 1983 मध्ये भारताला प्रत्येकी 7 कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.
1959 मध्ये भारतीय संघ एकूण 9 सामने खेळला होता. त्यातील 7 सामने पराभूत तर 1 सामन्यात विजय मिळवला होता. तसेच 1 सामना अनिर्णित राहिला होता.
त्याचबरोबर 1983 मध्ये भारताने 18 कसोटी सामने खेळले होते. त्यात भारताला 7 कसोटी सामन्यातील पराभव स्विकारावा लागले होते. तसेच त्यावर्षी भारताला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. त्यावर्षी 11 सामने हे अनिर्णित राहिले होते.
1983 नंतर जवळजवळ 35 वर्षांनी भारतीय संघ एका वर्षात 7 कसोटी सामने पराभूत झाला आहे. भारताने यावर्षी जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 2 कसोटी सामने, ऑगस्टमध्ये इंग्लंड दौऱ्यात 4 आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1 असे एकूण सात कसोटी सामन्यात पराभव स्विकारले आहेत.
विशेष म्हणजे भारताने यावर्षी खेळलेल्या 13 कसोटी सामन्यांपैकी एकही सामना अनिर्णित राहिलेला नाही. भारताने यावर्षी 6 कसोटी सामने जिंकले आहेत.
यावर्षात भारत झाला आहे सर्वाधिक कसोटी सामने पराभूत-
1959 – 7 सामने
1983 – 7 सामने
2018 – 7 सामने
2014 – 6 सामने
महत्त्वाच्या बातम्या:
–किंग कोहलीच्या बाबतीत झाला कोणालाही नको असलेला योगोयोग
–टीम इंडियाच्या सलामीवीरांनी केला असाही एक नकोसा विक्रम
–पर्थ कसोटी: भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने केली मालिकेत बरोबरी