---Advertisement---

ऑस्ट्रेलियाला पराभूत करत टीम इंडियाने ऑस्ट्रलियाचाच विक्रम काढला मोडीत!

On: बुधवार, जानेवारी 29, 2020 6:47 PM
---Advertisement---

मंगळवारी (28 जानेवारी) पोशेफ्स्ट्रूम (Potchefstroom), दक्षिण आफ्रिका (South Africa) येथे 19 वर्षाखालील विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. हा सामना भारताने 74 धावांनी जिंकला. हा सामना जिंकत भारताने एक खास विश्वविक्रमही केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकत भारताने 19 वर्षाखालील विश्वचषकात सलग 10वा विजय मिळवला आहे. त्यामुळे 19 वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक सलग विजय मिळवण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर झाला आहे. भारतीय संघाचा हा विजयी रथ 2018 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकापासून सुरु झाला आहे.

19 वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक सलग विजय मिळवण्याचा विश्वविक्रम युवा ऑस्ट्रेलिया संघाच्या नावावर होता. त्यांनी 2002-2004 या दरम्यान 19 वर्षाखालील विश्वचषकात सलग 9 विजय मिळवले होते. पण आता युवा भारतीय संघाने त्यांचा हा विक्रम मागे टाकला आहे.

विशेष म्हणजे या सलग 10 विजयांमध्ये भारताने पहिला आणि दहावा विजय हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---