बुधवार, 1 आॅगस्टपासून इंग्लंड विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात खेळताना इंग्लंडचा कर्णधार जो रुटने भारताविरुद्ध मोठा पराक्रम केला आहे.
त्याने या सामन्यात अर्धशतक करताना भारताविरुद्ध 12 व्यांदा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे जो रुटचा हा भारताविरुद्ध 12 वाच कसोटी सामना आहे आणि त्याने या प्रत्येक कसोटी सामन्याच्या प्रत्येकी एका डावात तरी 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या12 सामन्यांपैकी त्याने 3 शतके आणि 9 अर्धशतके केली आहेत.
तसेच त्याने असाच पराक्रम दक्षिण आफ्रिकेविरुद्धही केला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 सामन्यात खेळताना एकातरी डावात प्रत्येकी एका डावात तरी 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
याबरोबरच रुटने या सामन्यात कसोटी कारकिर्दीत 6000 धावांचा टप्पाही पार केला आहे. त्याला यासाठी या सामन्याआधी हा टप्पा गाठण्यासाठी 40 धावांची गरज होती.
हा पराक्रम करणारा तो इंग्लंडचा 15 वा खेळाडू ठरला आहे. याबरोबरच इंग्लंडकडून सर्वात कमी डावात कसोटीत 6000 धावा करणारा तो तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याने 127 व्या डावात 6000 धावा पूर्ण केल्या.
इंग्लंडकडून सर्वात कमी डावात कसोटीत 6000 धावा करणारे फलंदाज-
११४ – वॉली हॅमंड
११६-लेन हटन/केन बॅरिंग्टन
१२७-जो रुट
१२८-केविन पिटरसन
१३१-अॅलिस्टर कूक#म #मराठी @Maha_Sports @MarathiBrain @MarathiRT @kridajagat— Pranali Kodre (@Pranali_k18) August 1, 2018
तसेच तो सर्वात कमी वयात कसोटीत 6000 धावा करणाराही जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. या यादीत भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. तर अॅलिस्टर कूक दुसऱ्या स्थानी आहे.
सर्वात कमी वयात कसोटीत 6000 धावा करणारे फलंदाज-
२६ वर्ष ३१३ दिवस-सचिन तेंडुलकर
२७ वर्ष ४३ दिवस-अॅलिस्टर कूक
२७ वर्ष २१४ दिवस- जो रुट
२७ वर्ष ३२३ दिवस-ग्रॅमी स्मिथ
२८ वर्ष २१७ दिवस-स्टीव्ह स्मिथ#म #मराठी @Maha_Sports @MarathiBrain @MarathiRT @kridajagat— Pranali Kodre (@Pranali_k18) August 1, 2018
या सामन्यात इंग्लंडने पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात 3 बाद 163 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून जो रुट 65 धावांवर तर जॉनी बेअरस्टो 27 धावांवर नाबाद खेळत आहेत.
भारताकडून आर अश्विनने 1 आणि मोहम्मद शमीने 2 विकेट घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–भज्जीच्या या दोन फोटोमध्ये काय आहे नक्की फरक?
–पहिल्याच कसोटी सामन्यात आर अश्विनचा खास विक्रम
–पहिली कसोटी- इंग्लंडला पहिला धक्का, हा खेळाडू झाला बाद