---Advertisement---

कसोटी इतिहासात भारतीय वेगवान गोलंदाजांनी चौथ्यांदाच केला हा भीम पराक्रम

On: शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2019 6:01 PM
---Advertisement---

कोलकाता। आजपासून (22 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात इडन गार्डन्स स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी सामन्याला(Day-Night Test) सुरुवात झाली आहे. या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांत संपूष्टात आला आहे.

विशेष म्हणजे बांगलादेशच्या या डावातील सर्व 10 विकेट्स भारताच्या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. भारताकडून या डावात इशांत शर्माने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या तर उमेश यादवने 3 विकेट्स आणि मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या आहेत.

त्यामुळे कसोटीमध्ये केवळ चौथ्यांदाच असे झाले की भारताच्या वेगवान गोलंदाजांनी भारतात खेळताना प्रतिस्पर्धी संघाच्या एका डावातील सर्व 10 विकेट्स घेतल्या आहेत.

याआधी शेवटचे असे 2017 मध्ये श्रीलंका विरुद्ध कोलकाता येथेच झालेल्या कसोटी सामन्यात झाले होते. त्या सामन्यात भुवनेश्वर कुमार, शमी आणि उमेश या वेगवान गोलंदाजांनी मिळून एका डावात सर्व 10 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच सर्वात पहिल्यांदा 1982मध्ये मुंबईमध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी एका डावात सर्व 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्या सामन्यात कपिल देव आणि मदन लाल यांनी प्रत्येकी 5 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर 1983 मध्ये अहमदाबादमध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी सामन्यात कपिल देव यांनी 9 आणि बलविंदर संधू यांनी 1 अशा मिळून 10 विकेट्स घेतल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---