---Advertisement---

रोहित-राहुल जोडीची कमाल! तब्बल १४० धावांच्या भागीदारीसह मोठा विक्रम केला नावावर

---Advertisement---

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी२० विश्वचषकाचा सुपर १२ फेरीतील सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळला गेला. भारताने निर्धारित २० षटकात २ गडी गमावून २१० धावा केल्या. अफगाणिस्तानला विजयासाठी २११ धावांचे लक्ष्य मिळाले होते. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, भारतीय फलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी आपआपली अर्धशतके ठोकत शतकीय भागीदारी रचली. आपल्या शतकीय भागीदारीने दोघांनी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी १४० धावांची भागीदारी रचली. याशिवाय टी२० विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्यांदा भारतीय संघाने शतकीय भागीदारी रचली आहे. याआधी गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी २००७ सालच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी चार वेळा शतकीय भागीदारी रचली आहे. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक वेळा शतकीय भागीदारी रचण्याचा विक्रम पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या नावे आहे. पाकिस्तानच्या या सलामी जोडीने पाच वेळा अशी कामगिरी बजावली आहे.

दुसऱ्या स्थानी भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन आहेत. दोघांनी चार वेळा शतकी भागीदारी केली आहे. न्यूझीलंडचे सलामीवीर केन विलियम्सन आणि मार्टिन गप्टील ही जोडीही संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनीही चार वेळा शतकीय भागीदारी रचली आहे. आता रोहित-राहुलच्या जोडीनेही त्यांची बरोबरी केली आहे.

तत्पूर्वी, भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने सर्वाधिक ७४ धावा केल्या. केएल राहुलने ६९ धावांचे योगदान दिले. रोहित आणि राहुल यांनी १४० धावांची सलामी भागीदारी केली. यानंतर रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी जोरदार फटकेबाजी करत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ६३ धावांची भागीदारी केली. रिषभ पंतने १३ चेंडूत २७ आणि हार्दिक पांड्याने १३ चेंडूत ३५ धावा केल्या आणि दोघेही नाबाद परतले. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायब आणि करीम जनात यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्यानंतर २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला २० षटकात ७ बाद १४४ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना ६६ धावांनी जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताला जेतेपदाचा प्रबळ दावेदार सांगणाऱ्या ब्रेट लीने घेतला यू-टर्न, आता ‘या’ दोन संघांचे घेतले नाव

टी२० विश्वचषकात भारताला सुरुवातीलाच अपयश आल्याने विनोद कांबळीची धोनीच्या मार्गदर्शक पदावर टीका

स्कॉटलंडविरुद्ध न्यूझीलंडचा १६ धावांनी महत्त्वपूर्ण विजय, मार्टिन गप्टिलची तुफानी खेळी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---